Majalgaon Crime News 
मराठवाडा

सख्ख्या भावाने काढला सख्ख्या भावाचा काटा, तीक्ष्ण हत्याराने केला खून

कमलेश जाब्रस

माजलगाव (जि.बीड) : तालुक्यातील पात्रुड येथे मुख्य रस्त्यावर असलेल्या प्लाॅटचा दोन सख्ख्या भावात वाद होता. या वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा तीक्ष्ण हत्याराने जखमी करून खुन केल्याची घटना तालुक्यातील पात्रुड येथे सोमवारी (ता.आठ) सायंकाळी आठ वाजता घडली असून आरोपी शेख अर्षदला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील पात्रुड येथे मुख्य रस्त्यावर शेख शकील यांची जागा आहे.

या जागेवरून शेख अर्षद व शेख इर्शाद या दोन भावांमध्ये मागील अनेक दिवसांपासुन कुरबुर होती. या वादाचे रूपांतर आज भांडणात होऊन लहान भाऊ अर्षद याने त्याचा मोठा भाऊ इर्षाद याला तीक्ष्ण हत्याराने जखमी करून खुन केल्याची घटना घडली आहे. जखमी अवस्थेत माजलगाव रूग्णालयात दाखल केले असता पोटांमध्ये गंभीर घाव झाल्याने शेख इर्शादचा जागीच मृत्यु झाला आहे. आरोपी अर्षदला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.

संपादन - गणेश पिेटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT