Crime Against Women 
मराठवाडा

मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, पतीच्या मित्रानेच पत्नीवर तीन वर्षे अत्याचार करुन उकळले पैसे

प्रवीण फुटके

परळी वैजनाथ (बातमीदार)  : शहरात पतीच्या मित्राने तीन वर्षे अत्याचार करुन साडेआठ लाख रुपये उकळल्याची घटना गुरुवारी (ता.आठ) उघडकीस आली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत. येथील शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे ३३ वर्षीय पीडित महिला कुटुंबीयासह राहते. महिलेच्या पतीचा मित्र यांच्या घरी नेहमी ये-जा करत असे. यातून त्याच्याशी ओळख झाली. त्याने महिलेला धमकावून जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

त्यानंतर विश्वास संपादन करुन आठ लाख रुपये नगदी व साठ हजार रुपये किमतीच्या दोन तोळ्याच्या अंगठ्या असा एकूण आठ लाख ६० हजार रुपये उकळले. ते परत मागितल्यावर पीडितेला काठीने मारहाण करुन धमक्या दिल्या. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरुन (रा.बडवणी ता.गंगाखेड जि.परभणी) याच्यावर बुधवारी (ता.सात) रात्री येथील शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपी फरार असून तपास सहायक निरीक्षक अशोक खरात हे करत आहेत.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil : रुग्णवाहिका आणि औषध खरेदीत प्रचंड भ्रष्टाचार, सतेज पाटलांचा कोणावर रोख

Rohit Sharma: 'आज फेअरवेल मॅच होती!', गौतम गंभीरच्या कमेंटवर रोहितने काय दिली रिअॅक्शन? पाहा Viral Video

Virginity Test: संतापजनक! आधी कौमार्य चाचणी करा, नंतरच प्रवेश... मदरशाकडून सातवीतील विद्यार्थिनीकडे प्रमाणपत्राची मागणी

Indian Railways Smart Toilet : ट्रेनमधील शौचालये फक्त ५६ सेकंदात स्वच्छ होणार! नवीन तंत्रज्ञान काय? जाणून घ्या...

Bhagvad Gita Lessons in Marathi: दुसऱ्यांच्या 'परफेक्शन'च्या मागे धावू नका; तुमचा स्वत:चा मार्गच आहे चांगला : भगवद् गीतेतील शिकवण

SCROLL FOR NEXT