sand smugglers beat Talathi In BHandara district  
मराठवाडा

वाळूतस्कराने तलाठ्याला दगडाने मारहाण करत दिली धमकी

निसार शेख

महसूल व पोलिस प्रशासनाचा आष्टी तालुक्यात धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे.

आष्टी (जि.बीड) : तालुक्यातील Ashti धानोरा येथे विनापरवाना वाळूचा ट्रॅक्टर पकडणाऱ्या मंडळ अधिकारी व तलाठी यांना वाळू तस्कराकडून दगडाने मारहाण करत धमकी देत ट्रॅक्टरसह पळून गेला. या प्रकरणी सदरील धानोरा सज्जाचे तलाठी यांनी शुक्रवारी (ता.२५) अंभोरा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आष्टी तालुक्यातील कडा, धानोरा टाकळसिंग, कानडी, शिराळ, निमगाव चोभा, देविनिमगाव, घोंगडेवाडी तसेच सीना नदीच्या पात्रातून राजरोसपणे विना परवाना वाळू उपसा सुरू आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. महसूल व पोलिस प्रशासनाचा आष्टी तालुक्यात Beed धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. धानोरा मंडळ विभागाचे मंडळ अधिकारी एस.एन.गवळी व धानोरा सज्जाचे तलाठी अनिल ठाकरे हे शुक्रवारी सकाळी धानोरा कुंभारवाडी रस्त्यावर थांबले असता त्यांना विना क्रमांकाचा वाळूने भरलेला ट्रॅक्टर आढळून आला. यावेळी ट्रॅक्टर चालक नागेश अशोक होळकर यास वाळू परवाला विषयी चौकशी केली. त्याने परवाना माझ्याकडे नाही म्हणत ट्रॅक्टर पळून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता तलाठी अनिल ठाकरे यांनी सदरील ट्रॅक्टर अडविला.beed crime news sand smuggler beaten village revenue chief in ashti tahsil

याचा राग येऊन नागेश होळकर याने अनिल ठाकरे यांना धमकी देत दगडाने मारहाण केली असून त्यांच्या हाताला चांगलाच मार लागला आहे. याचवेळी नागेश होळकर याने वाळूच्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर घेऊन पळून गेला. या प्रकरणी तलाठी अनिल ठाकरे यांनी अंभोरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल लोखंडे हे करित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

karoline leavitt ट्रम्प यांच्या २८ वर्षीय अधिकारी तरुणीनं ६० वर्षीय व्यक्तीशी का केलं लग्न? स्वत:च केला खुलासा

Heart Blockage: हार्ट ब्लॉकेज कमी करतात ‘या’ 3 भाज्या, डॉक्टरही देतात रोज खाण्याचा सल्ला

Latest Marathi News Update LIVE : थार आणि कारचा भीषण अपघात, ५०० फूट खोल दरीत कार कोसळली, ६ पैकी ४ जणांचे मृतदेह सापडले, २ अजूनही बेपत्ता

kolhapur kagal politics: मुश्रीफ -राजे गट एकत्र आल्यानंतर, मंडलिकांनी वेगळी चाल खेळली; संजय घाटगेंची भेट घेत केली बंद खोलीत चर्चा

Swarnagiri Temple Tourism: स्वर्गासारखे तेजस्वी ‘स्वर्णगिरी’ मंदिर पाहताक्षणी मन मंत्रमुग्ध होते! जाणून घ्या प्रवासाचा संपूर्ण मार्ग

SCROLL FOR NEXT