kaij crime news 
मराठवाडा

व्हॉट्सअॅप स्टेट्स ठेवणे पडले महागात, दोन गटांत तुंबळ हाणामारी

सकाळ वृत्तसेवा

केज (जि.बीड) : व्हाॅट्सअॅपवर ठेवलेल्या स्टेट्सवरून दोन गटात वाद होऊन काठी व दगडाने मारहाण करण्यात आली. या हाणामारीत एका महिलेसह दोघे जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ९) जाधवजवळा येथे घडली. याप्रकरणी आठ जणांविरोधात पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  तालुक्यातील जाधवजवळा येथील मनोहर गौतम जावळे यांना तुझ्या भावाने मोबाईलमध्ये आम्हाला उद्देशून स्टेट्स का ठेवले? असे म्हणत अभिजित विठ्ठल जावळे याने त्यांच्या भावास खाली पाडले तर विठ्ठल नारायण जावळे, उत्रेश्वर नारायण जावळे या दोघांनी काठीने व दगडाने मारहाण करीत डोके फोडले.

यावेळी मनोहर जावळे यांची आई भांडण सोडविण्यासाठी आली असता त्यांना पण शिवीगाळ करून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. तर दुसऱ्या गटाचे उत्रेश्वर नारायण जावळे यांना मोबाईलवर राजकारणाचे स्टेट्स ठेवण्याच्या कारणावरून ते दिव्यांग असताना शिवीगाळ करीत भीमा सुनील जावळे, अजय गौतम जावळे, मनोहर गौतम जावळे, रोहीत बन्सी जावळे, रोहण डिगंबर जावळे यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मनोहर जावळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अभिजित जावळे, विठ्ठल जावळे, उत्रेश्वर जावळे यांच्याविरुद्ध तर उत्रेश्वर जावळे यांच्या तक्रारीवरून भीमा जावळे, अजय जावळे, मनोहर जावळे, रोहीत जावळे, रोहण जावळे यांच्याविरोधात पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस नाईक दिनकर पुरी व धनपाल लोखंडे हे करीत आहेत. 

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: भारताविरुद्ध शाय होपच्या नाबाद १६२ धावांनी मोडला ३७ वर्षांचा रेकॉर्ड; रोहित-डिव्हिलियर्सलाही टाकले मागे

IND vs WI,3rd ODI: शाय होपचं दीडशतक अन् वेस्ट इंडिजचा सर्वात मोठा विजय; मात्र भारताने जिंकली मालिका

PM झालो तर काय करेन? संजय दत्तचं मुन्नाभाई स्टाईलने उत्तर, ट्रम्प यांना म्हणाला...'मामू, तुम भटक गए हो' पंतप्रधान मोदींवरही टोलेबाजी

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

SCROLL FOR NEXT