beed news
beed news beed news
मराठवाडा

पुराच्या पाण्यात दुचाकीसह दोघे गेले वाहून; एकाचा मृतदेह सापडला

रामदास साबळे

आईला भेटण्यासाठी गावी येताना नदीवरील पुलावरून वाहणाऱ्या पूराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह दोघे वाहून गेले.

केज - आईला भेटण्यासाठी गावी येताना नदीवरील पुलावरून वाहणाऱ्या पूराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह दोघे वाहून गेले. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. ही घटना रविवार (ता.२६) रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास धारूर-चिंचपूर रस्त्यावरील खारी नदीच्या पुलावर घडली. सोशल मिडियावरून टाकण्यात आलेल्या फोटोवरून ते दोघे उंदरी येथील असल्याने समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत वाहून गेलेल्यांची महादेव बळीराम सोनवणे व उत्तम बन्सी सोनवणे अशी नावे आहेत.

तालुक्यात मागील काही दिवसांपासून सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. नद्या-नाल्या तुडूंब भरून वाहत असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पूरात वाहून गेल्याच्या घटना घडत असतानाच रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास महादेव सोनवणे व उत्तम सोनवणे हे दोघे दुचाकीवरून (एमएच-४४/७८२९) धारूर-चिंचपूर रस्त्याने गावाकडे येत होते. त्यावेळी ते चिंचपूर शिवारातील खारी नदीवरील पुलाजवळ आले असता पुलावरून पुराचे पाणी वेगाने वाहत होते. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने पुलावरून वाहणाऱ्या जोराच्या प्रवाहात ते दोघे दुचाकीसह वाहून गेले.

महादेव यांचा दुचाकीमध्ये पाय अडकल्याने ते पुलाच्या नळीला अडकले. मात्र पाणी अधिक असल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या सोबत असणारे उत्तम सोनवणे हे मात्र बेपत्ता झाले आहेत. सोशल मिडिया वरील फोटोवरून ही दुचाकी उंदरी येथील असल्याने पंचायत समितीचे माजी सदस्य सुदाम ठोंबरे यांनी सहकार्यासह धारूर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांसह रात्री उशिरा घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पुलावरील पाण्याचा ओघ ओसरला होता.

पुलाच्या नळीला अडकलेल्या दुचाकीसह महादेव सोनवणे यांचा मृतदेह बाहेर काढला. मात्र बेपत्ता उत्तम सोनवणे यांचा रात्रीचा अंधार असल्याने शोध घेता आला नाही. मृतदेह धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात तर दुचाकी पोलीस ठाण्यात लावण्यात आली आहे. घटना नेमकी कशी घडली हे मात्र नक्की समजले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT