बीड : विविध आमिषांनी शहरी भागातील फसवणुकीचे लोण ग्रामीण भागातही पोचले आहे. शेतकरी महिलेची केबीसीच्या (कौन बनेगा करोडपती) नावाखाली लॉटरी व कारचे आमिष दाखवून तीन लाख रुपयांना फसवणूक झाल्याची घटना समोर आली. पहाडी दहिफळ (ता. धारुर) येथे गुरुवारी हा प्रकार समोर आला असून याप्रकरणी धारुर ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
अश्विनी मुंजाबा नांदे (वय २५, रा. पहाडी दहिफळ, ता. धारुर) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. नांदे कुटुंबीयांचा शेती हा व्यवसाय आहे. ता. २९ ऑक्टोबरला सकाळी साडेअकरा वाजता व्हॉटस्अपवर अनोळखी व्यक्तीने मेसेज पाठवून आपणास केबीसीची २५ लाखांची लॉटरी व आलिशान कारचे बक्षीस लागल्याची बतावणी केली. यानंतर अश्विनी नांदे यांनी संबंधितास फोन केला असता समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने आपले नाव रामचंद्रकुमार असल्याचे सांगितले. अश्विनी नांदे यांनी आधी २५ लाख रुपये पाठवा, असे म्हटले असता रामचंद्रकुमार याने अकाऊंट क्रमांक, आधार, पासपोर्ट फोटो पाठविण्यास सांगितले.
तुमचे पैसे एटीएम मशीनमध्ये टाकून ठेवलेले असून वेगवेगळी कारणे देऊन पैसे मागण्यास सुरुवात केली. तीन लाख रुपये दिल्यानंतरही लॉटरी व गाडीची पूर्तता न झाल्याने अश्विनी यांनी तातडीने सायबर विभागाकडे धाव घेतली. पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड, उपनिरीक्षक संदीप जाधव यांनी त्यांची कैफियत जाणून घेतली. त्यानंतर धारुर ठाण्यात ७ डिसेंबरला रामचंद्रकुमार नावाच्या भामट्यावर फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.
सहायक अधीक्षक पंकज कुमावत तपास करीत आहेत. महिनाभरात रामचंद्रकुमार याने वेगवेळ्या कारणावरून अश्विनी नांदे यांच्याकडे पैशांची मागणी करत राहिला. लॉटरीच्या आमिषाने अश्विनी नांदे वेगवेगळ्या अकाऊंटवर तसेच क्यूआर कोडवर पैसे टाकत राहिल्या. उसनवारी करून त्यांनी पैशांची तजवीज करून १७ टप्प्यांत सुमारे दोन लाख ९५ हजार ३०० रुपये भरले. मात्र, त्याने २५ लाखांची लॉटरी रक्कम व आलिशान कार देण्यास टाळाटाळ केल्यावर फसवणूक झाल्याचे अश्विनी नांदे यांच्या लक्षात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.