मराठवाडा

बीड जिल्ह्यात कोरोनाचा वेग दुप्पटीने वाढला,एका दिवसातील पॉझिटिव्हचा रेट २५ टक्के

गणेश पिटेकर

बीड : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील वर्षीच्या तुलनेत एका दिवसातील रुग्ण बाधितचे प्रमाण आता २५ टक्क्यांच्या घरात गेले आहे. पहिल्या लाटेत सप्टेंबर २०२० महिन्यात एका दिवसात असलेली ॲक्टिव्ह रुग्णसंख्याही आता दुप्पट झाली आहे. असे असले तरी जिल्ह्यातील रुग्णालयात एकूण पाच हजार ९०७ खाटांपैकी दोन हजार ४९४ खाटा शिल्लक आहेत. मागील वर्षी राज्यभरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असताना दोन महिने कोरोनाला वेशीवर थोपविण्यात बीड जिल्ह्याला यश आले होते.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे आगमन झाले. त्याचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून दररोज बाधित रुग्णांची आकडेवारी नवीन उच्चांक गाठत आहे. सुरुवातीला शहरापर्यंत असलेल्या कोरोनाचा प्रसार आता खेड्यापाड्यासह वाडी, वस्ती, तांड्यावरही जाऊन पोहोचला आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा नवीन स्ट्रेन रुग्णांना झपाट्याने बाधित करीत आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात दररोज बाधित रुग्णांची संख्या हजाराच्या वर गेली असून मृत्यू दरही झपाट्याने वाढला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोविड सेंटर हाउसफुल्ल होत असले तरी अद्याप विविध रुग्णालयांतील दोन हजार ४९४ खाटा शिल्लक आहेत.

मागीलवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत सप्टेंबर २०२० मध्ये बीड जिल्ह्यात एका दिवसातील सर्वोच्च ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ही दोन हजार ३० एवढी होती. यावर्षी ही रुग्णसंख्या ६ हजाराच्या घरात गेली आहे. मागील वर्षी एका दिवसात कोरोनाबाधित रुग्णांची सर्वोच्च संख्या ही ४०४ होती तर, दुसऱ्या लाटेत ती एक हजाराच्या वर गेली आहे. जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरसह खाजगी रुग्णालयांत सध्या तीन हजार ३०० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत असून जवळपास दोन हजार रुग्ण हे होम आयशोलेशनमध्ये आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Qualifier 1 : दोन्ही अय्यरची अर्धशतके; केकेआरने हैदराबादला मात देत गाठली फायनल

Rahul Gandhi on Pune Porsche Accident: पुणे पोर्शे दुर्घटनेवरून राहुल गांधींनी PM मोदींवर सोडलं टीकास्त्र, म्हणाले 'दोन भारत...'

Pune Porsche Accident : पब चालविणे गंमत आहे का? पुणे पोर्शे अपघातप्रकरणी न्यायालयाचे आरोपींना खडेबोल

Sambit Patra : भगवान जगन्नाथांबद्दल बोलताना जीभ घसरली, भाजपचे संबित पात्रा करणार तीन दिवस उपवास, नेमकं काय म्हणाले होते?

Moringa Powder : आडवी तिडवी सुटलेली ढेरी कमी करते या पानांची पावडर, जाणून घ्या मोरिंग्याचे पाणी पिण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT