Beed Lok Sabha 2024 Esakal
मराठवाडा

Beed Lok Sabha 2024: मतांचे ध्रुवीकरण निर्णायक; पंकजा मुंडे विरूध्द शरद पवार उमेदवार देताना कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष

Beed Lok Sabha 2024: बीडमधून भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. ‘मविआ’त राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वाट्याची ही जागा असल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार उमेदवार देताना कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Beed Lok Sabha 2024: बीडमधून भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. ‘मविआ’त राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वाट्याची ही जागा असल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार उमेदवार देताना कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षण आंदोलनात बीड जिल्हा अत्यंत सक्रीय होता. मराठा समाजाच्या भावना या मागणीच्या बाबतीत तीव्र आहेत. उमेदवारांना याबाबत प्रचारात उत्तरे द्यावी लागती. लागेल. मतदार संघात सामाजिक समीकरणात ओबीसी व मराठा समान मते असून दलित- मुस्लिम मतांची संख्या देखील मोठी आहे. मतांच्या ध्रुवीकरणावर निकाल ठरणार आहे.

२०१९ चे चित्र

डॉ. प्रीतम मुंडे (भाजप) विजयी मते : ६,७८,१७५

बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस) मते : ५,०९,८०७

प्रा. विष्णू जाधव (वंचित बहुजन आघाडी) मते : ९२,१३९

संपत चव्हाण (अपक्ष) मते : १६७९२

विजयी उमेदवारांचे मताधिक्य : १,६८,३६८

वर्चस्व

२००४ : राष्ट्रवादी

२००९ : भाजप

२०१४ : भाजप

२०१९ : भाजप

सद्य:स्थिती

राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार निश्चित नाही. बजरंग सोनवणे किंवा डॉ. ज्योती मेटे यांची नावे चर्चेत.

आरक्षण आंदोलनामुळे ओबीसी- मराठा अशा टप्प्यावर निवडणूक जाणार.

ओबीसी मतांची बेगमी ही पंकजा मुंडेंची जमेची बाजू.

राष्ट्रवादीत एकमेव आमदार असला तरी सत्ताधाऱ्यांवर नाराजी, आरक्षणामुळे नाराज मराठा समाज ही आघाडीची जमेची बाजू.

हे मुद्दे प्रभावी ठरणार

सलग १० वर्षे सत्ता असून जिव्हाळ्याचा नगर- बीड- परळी रेल्वेमार्ग अपूर्ण.

मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने सगोसोयरे, मराठा तरुणांवर गुन्हे आदी निर्णय प्रलंबित

पंकजा मुंडेंचा घटलेला संपर्क व त्यांचा बंद पडलेला साखर कारखाना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejas Fighter Jet Crash: एअर शोमध्ये मोठा अपघात! भारताचे तेजस लढाऊ विमान कोसळले; थरारक व्हिडिओ व्हायरल

Masti 4 X Review: अडल्ट कॉमेडीचा ओव्हरडोस! कसा आहे आफताब- रितेश- विवेकचा 'मस्ती ४'? एक्सवर नेटकरी म्हणतात-

Latest Marathi News Live Update : कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपाला मोठा धक्का

BIBI-ka-Maqbara: जागोजागी पडझड, सौंदर्य काळवंडले! हेच आहे का वारसा संवर्धन? बीबी-का-मकबरा विचारतोय प्रश्न

Viral Video: बिबट्या ड्रेस घालून नेहा कक्करने अंगावर ओतलं पाणी, लाईव्ह कॉन्सर्टमध्ये केलं अस काही की, नेटकरी म्हणाले...'मोगली सेना'

SCROLL FOR NEXT