संग्रहित छायाचित्र  
मराठवाडा

बीड खून प्रकरण - तिघांवर दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार, १२ आरोपींना कोठडी 

सकाळ वृत्तसेवा

केज (जि. बीड) - तालुक्यातील मांगवडगाव येथील शेतीच्या वादातून हत्या झालेल्या पवार कुटुंबातील तिघांवर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. १५) कळंब येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर तब्बल २४ तासांनी मृतदेह ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, या प्रकरणातील १२ आरोपींना न्यायालयाने २१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

शासनाने पीडित कुटुंबीयांना २८ लाख ७५ हजार रुपयांची मदत करून त्यातील पहिल्या टप्प्याचे धनादेशही दिले. तालुक्यातील मांगवडगाव येथील पवार व निंबाळकर या दोन कुटुंबांमधील शेतजमिनीच्या वादातून बुधवारी (ता. १३) रात्री उशिरा बाबू शंकर पवार, प्रकाश बाबू पवार व संजय बाबू पवार या तिघा बापलेकांची हत्या झाली. तर, एक महिला जखमी झाली. याप्रकरणी युसूफ वडगाव पोलिस ठाण्यात धनराज बाबू पवार यांच्या फिर्यादीवरून १२ जणांविरोधात गुन्हा नोंद झाला.

दरम्यान, गुरुवारी मृतदेहांची उत्तरीय तपासणी झाली. मात्र, विविध मागण्यांसाठी मृतदेह ताब्यात घेतले नव्हते. शुक्रवारी अधिकाऱ्यांची मध्यस्थी व वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या संपर्कानंतर मृतदेह ताब्यात घेऊन कळंब येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणातील सर्व १२ आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना २१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणातील मृतांच्या कुटुंबीयांना व जखमींना शासनातर्फे २८ लाख ७५ हजार रुपयांची मदत जाहीर करून त्यातील पहिल्या टप्प्यातील १३ लाख ३७ हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Car Accident : पाबे घाट चढताना पावसामुळे कार घसरून दीडशे फूट दरीत कोसळली; तीन जण किरकोळ जखमी, सुदैवाने मोठी जीवित हानी टळली

शुक्राचा कन्या राशीत प्रवेश; सिंह राशीसह ४ राशींचे नशीब पालटणार! पैसा येणार, रखडलेली कामंही पूर्ण होणार

Mangalwedha News : उजनीतील एआय डेटा सेंटर प्रकल्पा बाबत विरोधकाकडून चुकीची माहिती; प्रदेश सरचिटणीस सुदर्शन यादव

Government Employee: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना भेट; तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय

Who Is Nidhi Razdan : उमर अब्दुल्लांशी लग्न करणाऱ्या निधी राजदान कोण? त्यांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT