Atul Save esakal
मराठवाडा

Beed News : कार्यशैलीचा परिणाम? पालकमंत्री सावेंच्या कार्यक्रमाला भाजपचेही लोकप्रतिनिधी नाही

सकाळ डिजिटल टीम

बीड : पालकमंत्रीपद हे मानाचे पद तर आहेच शिवाय मंत्री म्हणजे शासनाचा प्रतिनिधी असतो. पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन समितीसह इतरही अनेक अधिकार आणि त्यांच्याकडे सहकार, इतर मागास बहुजन कल्याण हे महत्वाचे खातेही आहे.

दरम्यान, शुक्रवारी (ता. १६) पालकमंत्री अतुल सावे जिल्ह्यात आले आणि गेले. त्यांच्या दौऱ्यात इतर पक्षाचे तर दुरच पण त्यांच्या भाजप पक्षातीलएकही लोकप्रनिधींने हजेरी लावली नाही. सावे यांच्या पालकमंत्री म्हणून कारभाराचा हा परिणाम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.

अतुल सावे यांच्या हस्ते शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीमधून पोलिस दलासाठी खरेदी केलेल्या वाहनांचे लोकार्पण आणि भाजपच्या बुथ समिती बैठक झाली. जिल्ह्यात भाजपचे चार लोकप्रतिनिधी आहेत. मात्र, एकानेही श्री. सावेंच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. यावरुन सावे भाजपजनांना किती हवेसे वाटतात हे स्पष्ट आहे.

पालकमंत्री आल्यानंतर संबंधीत पक्षाचे खासदार - आमदार तर असतातच. शिवाय इतर पक्षांचे लोकप्रतिनिधी देखील मतदार संघातील कामांसाठी मंत्र्यांची भेट घेण्यासाठी थांबतात.

शासनाचे प्रमुख प्रतिनिधी म्हणून प्रोटोकॉलसह कामांची गरज म्हणून मंत्री व पालकमंत्र्यांना लोकप्रतिनिधी भेट घेतात. मुंबईला जाऊन भेट घेण्यापेक्षा जिल्ह्यात मंत्री आल्यानंतर अधिक सोपे म्हणून गर्दी अधिकच वाढते.

अगदी घरगुती कार्यक्रम असेल तरी मंत्र्यांच्या भोवती नेत्यांचा घोळका असतो. परंतु, जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर अतुल सावे यांनी केलेल्या कारभारावरुन नाराजी यापूर्वीपासूनच सुरु झाली आहे. जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी वरिष्ठांच्या कानावर तक्रारी घालण्याबरोबर लेखीही तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्यानंतरही कारभारात सुधारणा झाली नाही.

त्यामुळे अगदी भाजप पक्षाच्याच लोकप्रनिधींनीही ‘या आणि जा’ आम्हाला घेणे देणे नाही, असेच अप्रत्यक्ष सांगितल्याचे शुक्रवारच्या दौऱ्यावरुन दिसले. जिल्ह्यात खासदार डॉ. प्रितम मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार लक्ष्मण पवार, आमदार नमिता मुंदडा हे चार लोकप्रतिनिधी आहेत. सावे यांच्या सुरुवातींच्या दौऱ्यात भाजपचे नेते असत. मात्र, शुक्रवारचा त्यांचा दौरा संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT