मराठवाडा

बीड शहरात विष घेतलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

बीड - इनामी जमिनीच्या पडताळणी प्रमाणपत्रासाठी खेटे मारणाऱ्या एका शेतकऱ्याने शुक्रवारी येथील भूसुधार कार्यालयातच विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. रविवारी (ता.17) पहाटे या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

प्रल्हाद हरिभाऊ टेकाळे (वय 45, रा. नागापूर बु.) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. नागापूर (बुद्रुक) येथे गट क्र. 106 मध्ये सय्यद शफीक सय्यद हामजा यांची इनामी जमीन आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी 20 आर जमीन सय्यद शफीक यांच्याकडून प्रल्हाद टेकाळे यांनी शेतीसाठी खरेदी केली होती. मात्र, इनामी जमीन खरेदी-विक्री करताना उपल्हिाधिकारी सामान्य (भूसुधार) विभागाचे पडताळणी प्रमाणपत्र आवश्‍यक असते. त्याशिवाय सातबारा व आठ-अ उताऱ्यावर नोंद होत नाही. खरेदी व्यवहार झाल्यानंतर टेकाळे यांनी पडताळणी प्रमाणपत्रासाठी उपजिल्हाधिकारी सामान्य (भूसुधार) यांच्याकडे अर्ज केले; परंतु सहा महिन्यांपासून टोलवाटोलवी सुरू होती. कार्यालयाचे उंबरठे झिजवून वैतागलेल्या प्रल्हाद टेकाळे यांनी शुक्रवारी उपजिल्हाधिकारी भूसुधार कार्यालयात विष प्राशन केले होते. जिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच रविवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

प्रशासनाची असंवेदनशीलता
टेकाळे आत्महत्या प्रकरणाच्या निमित्ताने प्रशासनाची असंवेदनशीलता दिसून आली. शुक्रवारी प्रल्हाद टेकाळे यांनी विषारी द्रव प्राशन केल्यानंतर शनिवारी पडताळणी प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. दुर्दैवाने प्रल्हाद यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर प्रशासनाला आलेली उपरती निष्फळ ठरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT