कांचन (कविता) विशाल राठोड 
मराठवाडा

महिलेचा मृत्यू होताच नवरा पळाला, गेवराईतील धक्कादायक घटना

वैजीनाथ जाधव

कांचन (कविता) विशाल राठोड (वय २६) सिद्धीविनायक नगरमध्ये तिच्या सासरी राहत होती. कोणत्या तरी कारणावरून सासरचे लोक तिचा मानसिक, शारीरिक त्रास देऊन छळ करीत होते.

गेवराई (जि.बीड) : एका विवाहित महिलेचा तिचा नवरा, सासू, सासरा, दीराने मिळून शारीरिक व मानसिक छळ करून तिला बळजबरीने विष पाजल्याची घटना गेवराई Georai येथील सिद्धीविनायक काॅलनीत घडली असून, शुक्रवार (ता.२५) रोजी सकाळी सात वाजता सदरील महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, सासरच्या लोकांविरोधात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी करून महिलेच्या नातेवाईकांनी गेवराई पोलिस ठाण्यासमोर मुलीचा मृतदेह ठेवून ठिय्या दिला. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. विशेष बाब म्हणजे, महिलेचा मृत्यू होताच नवरा व अन्य लोकांनी घटनास्थळावरून पळ काढल्याने महिलेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. कांचन (कविता) विशाल राठोड (वय २६) सिद्धीविनायक नगरमध्ये तिच्या सासरी राहत होती. कोणत्या तरी कारणावरून सासरचे लोक तिचा मानसिक, शारीरिक त्रास देऊन छळ करीत होते. ता.10 जून रोजी तिला बळजबरीने नवरा, सासू, सासरे आणि दीराने मिळून तिला विष पाजले. अत्यवस्थ अवस्थेत तिला गेवराई येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू, प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला औरंगाबाद Aurangabad येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तिचा गुरूवारी (ता.२४) रोजी सकाळी सात वाजता मृत्यू झाला.beed news in laws killed woman through poison, relatives allegation

महिलेचा मृत्यू होताच, तिचा नवरा, सासू, सासरे व दीराने घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, शुक्रवारी (ता.२५) रोजी महिलेच्या नातेवाईकांनी गेवराई पोलिस ठाण्यात मृतदेह आणून ठिय्या दिला. जोपर्यंत खूनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही, अशी कठोर भूमिका घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी शांततेची भूमिका घेऊन प्रकरण हाताळले. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirav Modi: नीरव मोदीसह इतरांवरील भ्रष्टाचाराचे आरोप रद्द, CBI न्यायालयाचा मोठा निर्णय

मी सेटवरून रडत घरी आलेले... निवेदिता सराफ यांनी सांगितला हिंदी मालिकेचा कटू अनुभव; म्हणाल्या, 'माझ्या आईने मला...'

Monsoon 2026: राज्यासाठी धोक्याची घंटा, यंदा पाऊस कमी होणार.. चिंता वाढली..

Latest Marathi News Live Update : ठाणेकरांवर पाणीसंकट गडद, धरणाच्या पाणीपातळीत घट

Pachod Water Issue : पाणीपुरवठा योजनांचा केवळ फार्स ..! तीन योजना राबवूनही थेरगाव येथे तहान भागविण्यासाठी जिवघेणी कसरत

SCROLL FOR NEXT