pankaja munde
pankaja munde 
मराठवाडा

समाजासाठी आले स्वत:साठी नाहीः पंकजा मुंडे

दत्ता देशमुख

बीड: कर्मभूमीने नाकारले तरी जन्मभूमीने बोलावल्याने मी आले. केवळ समाजासाठी मी आले, माझ्या स्वत: साठी नाही, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. सावरगाव (घाट) (ता. पाटोदा, जि. बीड) येथे दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या.

भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थकांत भगवान गड येथील दसरा मेळाव्यावरून वाद शिगेला पोहोचला होता. शेवटी मुंडे यांना मेळावा घेण्यास महंत व त्यानंतर प्रशासनानेही परवानगी नाकारल्यानंतर मुंडे समर्थकांनी सावरगाव (घाट) या संत भगवानबाबांच्या जन्मगावी मेळावा घेण्याचा निर्धार केला होता. अत्यंत कमी वेळेत गावकर्यांनीही पंकजा व समर्थकांना मेळावा घेण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले. वेळ कमी असूनही मुंडे समर्थकांनी हा मेळावा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. मेळाव्यास मुंडे समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. ऐनवेळी स्थळ बदलल्याने समर्थकांची गैरसोय झाली असली तरी त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणात समाजाला भावनिक आवाहन करतानात नामदेव शास्त्रींवर टीकाही केली. सावरगावातच भगवानबाबांच्या नावाने संस्कार केंद्र व भव्य अशी मूर्ती उभी करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT