beed  sakal
मराठवाडा

Beed News : सर्जा-राजाचा साजश्रृंगाराला महागाईची झळ

रिमझिम पावसामुळे बाजारपेठेत चैतन्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा

जातेगाव - दीर्घ विश्रांतीनंतर जातेगाव परिसरात रिमझिम पाऊस बरसल्याने खरीप पिकांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत या भागातील शेतकरी असून, आता सर्व मदार परतीच्या पावसावर अवलंबून आहे.

रिमझिम धारांनी आजच्या परिस्थितीत शेतकरी काहीसे सुखावले आहेत. त्यातच पोळा दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे थंड असलेल्या बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे. शेतकरी बाजारात आपल्या बैलजोडीसाठी साज खरेदीला गर्दी करीत आहेत. दरम्यान मागील वर्षापेक्षा यंदा ३० ते ४० रुपयांनी साजश्रृंगाराच्या दरात वाढ झाली आहे. यंदाचा पोळा दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे शेतकऱ्यांची सर्वत्रच लगबग दिसत आहे.

वर्षभर सोबतीने घाम गाळणाऱ्या सर्जा-राजाकरिता नवीन साज खरेदीसाठी शेतकरी बाजारात गर्दी करताना दिसून येत असून सजावट साहित्यांनी बाजारपेठ सजली आहे. म्होरकी, वेसण, कासरा, कवडीमाळ, घुंगरमाळ, लोकरी गोंडे, बाशिंग आदी साहित्यांनी बाजारात रंग भरला आहे.

मात्र, महागाईमुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ३० ते ४० रुपयांनी साहित्याचे यंदा दर वाढले आहेत. त्यातच पावसाने दडी मारल्याने पोळा सणावर कोरड्या दुष्काळाचे सावट घोंगावत असताना तब्बल सव्वा महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा रिमझिम पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांना काहीशा प्रमाणात जीवदान मिळाले आहे.

बदलत्या काळानुरूप ग्रामीण भागात देखील ट्रॅक्टरसह इतर यंत्रांच्या साहाय्याने शेतीची मशागत होत असताना बैलजोडी आणि शेतीचे नाते काही शेतकऱ्यांचे आजही ठेवले असल्याचे पोळ्यानिमित्त पाहावयास मिळते. यांत्रिक पद्धतीने जरी शेती होत असली तरी दावणीला बैलजोडी असावी या भावनेतून काही शेतकरी बैलजोडी संभाळत असल्याचे चित्र आहे. दरम्यान पोळा सण गुरुवारी आहे. यामुळे जातेगाव येथील आठवडे बाजार हा बुधवारी (ता.१३) भरणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीकडून देण्यात आली.

वर्षभर राबणाऱ्या सर्जा-राजासाठी महागाईची तमा न बाळगता कोणत्याही परिस्थितीत थोडेसे का होईना साजश्रॄंगार साहित्य खरेदी करून सण साजरा करणार आहे.

प्रल्हाद शिंदे, शेतकरी, सेलू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT