Beed's Devotees Stranded At Amarnath  esakal
मराठवाडा

बीड जिल्ह्यातील ३९ भाविक अमरनाथमध्ये अडकले; प्रशासन, कुटुंबीय संपर्कात

बीड जिल्ह्यातील ३९ भाविक अमरनाथमध्ये अडकले

अनिरुद्ध धर्माधिकारी

आष्टी (जि.बीड) : अमरनाथ येथे ढगफुटी होऊन निर्माण झालेल्या परिस्थितीत आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील ३९ भाविक अडकले आहेत. यातील २८ भाविक वरच्या भागातून खाली आले असून, उर्वरित ११ जण अजून डोंगरावरच आहेत. प्रशासन या भाविकांच्या संपर्कात असून, सर्वजण सुखरूप असल्याची माहिती तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी दिली. धामणगाव येथून ता.५ जुलै रोजी ३९ भाविक अमरनाथ यात्रेला (Amarnath Yatra) गेले होते. ढगफुटीमुळे हे सर्वजण अडकून पडले होते. त्यातील २८ भाविक बालटल येथे सुखरूप खाली आले आहेत तर ११ जण अद्याप वर डोंगरातच अडकले आहेत. (Beed's 39 Devotees Stranded In Amarnath, All Are Safe)

अडकून पडलेल्या भाविकांच्या सुटकेसाठी एनडीआरएफ जवान व भारतीय लष्कराकडून मदतकार्य सुरू आहे. धामणगाव परिसरातून अमरनाथ येथे कैलास खिलारे (सांगवी पाटण), धामणगाव येथून काका पोकळे, संदीप चौधरी, संतोष मरकड, दिनेश पोकळे, भरत चौधरी, महेश लोखंडे आणि इतर व काही महिला भाविक असे ३९ जण भाविक भक्त गेलेले आहेत. त्यातील २८ जण खाली बालटल येथे सुखरूप तर अजूनही ११ जण वर अडकले आहेत. ढगफुटीनंतर काका पोकळे, कैलास खिलारे यांच्याशी डॉ. राजेश झिंजुर्क आणि सामाजिक कार्यकर्ते समीर शेख यांनी संपर्क साधून माहिती घेतली. (Beed Upates)

नेत्यांकडून विचारपूस

ढगफुटीमुळे आष्टी तालुक्यातील ३९ भाविक अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर आमदार सुरेश धस, धनंजय मुंडे, आमदार बाळासाहेब आजबे, जिल्हा परिषद सदस्य सतीश शिंदे यांनी भाविकांशी संपर्क साधून त्यांची विचारपूस करीत धीर दिला. तसेच प्रशासनालाही मदत करण्याची विनंती केली. घरी येण्याची राज्य सरकारने सोय करावी अशी मागणी केली गेली आहे.

हे भाविक अडकले

संतोष मरकड, सूरज वाढेकर, भाऊसाहेब पोकळे, भरत चौधरी, बापू शिंदे, छाया शिंदे, प्रयागा पोकळे, मणीराम खोजा, अशोक मंडा, किरण थोरवे, उषा पोकळे हे अकरा भाविक डोंगरावर अडकले आहेत. सर्वजण प्रशासन व कुटुंबाच्या संपर्कात असून, सुखरूप असल्याचे त्यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: कारंजा लाड येथे २३.६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त,दोघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT