file photo 
मराठवाडा

शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेस सुरवात 

नवनाथ येवले

नांदेड : शासन निर्णयानुसार राज्यात पहिल्यांदाच शिक्षकांच्या २०१८ मध्ये ऑनलाइन पद्धतीने बदल्या करण्यात आल्या. शिक्षकांसाठी आंतर जिल्हा बदली म्हणजे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी खर्चीक व दिवास्वप्न ठरत होते. मात्र, ऑनलाइन धोरणांमुळे हे सहज शक्य झाले. जिल्हा अंतर्गत बदल्यांमध्ये राजकीय वशिला, संघटना, स्वयंघोषित पदाधिकारी यांच्यासह अधिक पैजा मोजणाऱ्यांची कित्तेक वर्षाची मक्तेदारी मोडीत काढून वेळोवेळी यात बदल करुन सामान्य शिक्षकांना न्याय देणारे ऑनलाइन बदली धोरण तत्कालीन सरकारने आनले.


राज्यातील शिक्षकांचे ऑनलाइन बदली धोरण ठरविण्यासाठी शासनस्तरावरुन अभ्यास गट स्थापन करण्यात आला आहे. सामन्य शिक्षक ऑनलाइन बदली धोरणामुळे समाधानी आहेत. शिक्षकांच्या ऑनलाइन बदली धोरणामधील काही त्रुटी बदल्या झाल्यानंतर लक्षात आल्या. शिक्षकांच्या बदली प्रक्रियेतील संवर्ग एक हा दिव्यांग कर्मचारी शासन निर्णय २०१४ नुसार कॅन्सर, जन्मतः एक मूत्र पिंड असणे, मतिमंद पालक असल्यास विधवा, माजी सैनीक यांच्या पत्नी, वय ५३ वर्षापेक्षा जास्त वयाचे यासाठी आहे. यामध्ये दिव्यांग म्हणून विशेषतः त्याचे प्रमाण व दिव्यांगत्वाचा प्रकार स्पष्ट नाही. त्यामुळे सदृढ शिक्षक सुद्धा पाय, हात मोडला अथवा रॉड टाकला तरी ते संवर्ग एकमध्ये फॉर्म भरून बदलीचा लाभ घेत असल्याने मोठ्या प्रमणात शिक्षक विस्थापित होतात.

अनेक शिक्षकांच्या बंद शाळेवर बदल्या
प्रामुख्याने संवर्ग एक मध्ये फॉर्म भरताना उमेदवाराचे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्यांमार्फत तपासणी आवश्यक असताना जिल्हा परिषद प्रशासनाने तशी तसदी घेतली नाही. जिल्हा परिषदेकडून एनआयसी पुणे विभागास योग्य विलंबाने देण्यात आलेली माहितीही चुकीची देण्यात आली. त्यामुळे अनेक शिक्षकांच्या बंद शाळेवर बदल्या झाल्या. भौगोलिक परिस्थिती विभिन्नतेनुसार सोपे व अवघड क्षेत्र ठरविताना राजकीय हस्तक्षेप झाल्याचे उघड आहे.

सेवा ज्येष्ठ जोडीदारास दोन फॉर्मची मुभा गरजेची
बदली धोरणात वेळोवेळी दुरुस्ती केल्यामुळे एकदाच दोन वर्षाच्या बदल्या झाल्या. संवर्ग दोनमध्ये पती पत्नी यांना ३० किलोमीटरच्या आत आणले गेले, परंतु जे ३० किलोमीटरच्या आत होते ते बाहेर गेले कारण बदली पात्र होते. त्यांचे आयडी ब्लॉक करण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. सेवा ज्येष्ठ जोडीदारास दोन फॉर्म भरण्याची मुभा देणे गरजेचे होते. अंतर निश्चितीमध्ये गूगल मॅपने तर कधी बसचे अंतर ग्राह्य धरण्यात आल्याने काहींनी चुकीचे अंतर भरून बदली केली.

धोरणात सुधारणा केल्यास प्रक्रीया सोपी
संवर्ग तीनमध्ये अवघड भागात काम करणाऱ्या शिक्षकास पसंतीची शाळा मिळाली नाही. या उलट त्यास शहराजवळची शोभा भेटणे कठीण झाले असते. संवर्ग चारमध्ये बदली पात्र शिक्षकांना २० शाळांचे नाव आपल्या पसंती क्रमाने ऑनलाइन भरून अर्जाची प्रिंट काढून घ्यायची असे सरळ व सोपे ऑनलाइन शिक्षक बदली धोरण आहे.

जिल्हा परिषदेच्या कोणत्याच अधिकारांवर गदा नाही, बदली संबंधातील माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिन वरूनच भरली जाते. त्याद्वारे एनआयसी पुणेच्या माध्यमातून बदल्या होतात. दरम्यान, ऑनलाइन बदली धोरणात काही प्रमाणात सुधारणा केल्यास बदली प्रक्रिया आणखी सोपी आणि पादर्शक होईल. ऑनलाइन बदली धोरण बंद करण्यात येवू नये, अशी मागणी बदली हवी टीमचे रवी ढगे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT