मराठवाडा

उद्योजकांचा सूर, औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळाला मेट्रोचा होईल फायदा

जालन्यांपर्यंत यावी मेट्रो

उमेश वाघमारे

जालना : औरंगाबाद येथे प्रस्तावित असलेली मेट्रो रेल्वे(Metro) ही जालन्यापर्यंत (Jalna) व्हावी, अशी मागणी राजकीय क्षेत्रानंतर आता औद्योगिक क्षेत्रातून ही होत आहे. शेंद्रा औद्योगिक वसाहतीपर्यंत प्रस्ताविक ही मेट्रो जालना शहरापर्यंत आली तर त्याचा जालना औद्योगिक क्षेत्राला ही फायदा होईल. तसेच रेल्वेला अपेक्षित उत्पन्न मिळेल त्यामुळे ही मेट्रो रेल्वे जालन्यापर्यंत आली पाहिजे असा सुरू निघत आहे. दरम्यान औरंगाबाद (Aurangabad) येथील वाळूज ते शेंद्रा औद्योगिक वसाहत मेट्रो रेल्वे मार्ग विचाराधीन असून याचा तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार होण्यास अजून अवधी आहे. मात्र, या तपशीलवार प्रकल्प अहवालात जालना शहरापर्यंत मेट्रो रेल्वेचा ही विचार केला जावा, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

अशी आहे औरंगाबादची मेट्रो

औरंगाबाद : वाळूज एमआयडीसी ते शेंद्रा डीएमआयसीला जोडणारी मेट्रो रेल्वे सेवा प्रस्तावित आहे. त्यासाठी डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्यासाठी महामेट्रोला (महाराष्ट्र रेल्वे कार्पोरेशन ली.) देण्यात आले आहे. डीपीआरसाठी लागणारा खर्च औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनतर्फे केला जाणार आहे. यासोबतच वाळूज ते शेंद्रा एकच उड्डाणपूल तयार करणे व शहराचा सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा (सीएमपी) तयार केला जाणार आहे. येत्या आठ ते नऊ महिन्यात डीपीआर तयार होईल, असे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

रेल्वेकडून कोणताही नवीन मार्ग सुरू करताना रेल्वेच्या उत्पन्नाची बाजू तपासली जाते. प्रस्तावित असलेली औरंगाबाद मेट्रो रेल्वे ही शेंद्रापर्यंत येत असेल तर ही पुढे ३५ ते ४० किलोमीटर आणली तर मेट्रो रेल्वेसाठी हा मार्ग आर्थिक उत्पन्नाचा ठरेल. तसेच औरंगाबाद औद्योगिक वसाहतीसह जालना औद्योगिक वसाहतीसह ही मेट्रो रेल्वे उपयुक्त ठरले. याबाबीचा विचार केला जाईल अशी अपेक्षा आहे.

- सुनीलभाई रायठठ्ठा, उद्योजक, विनोदराय इंजिनिअर्स, जालना

जालना आणि औरंगाबाद औद्योगिक वसाहतीमध्ये लागणारे कुशल मनुष्य बळ हे आज घडीला अपडाऊन करत आहे. त्यामुळे शेंद्रा औद्योगिक वसाहतीपर्यंत प्रस्तावित असलेली मेट्रो रेल्वे जालना शहरापर्यंत आली तर या औरंगाबादसह शेकटा, करमाड, बदनापूर आणि जालना येथील कामगारांचे औरंगाबाद किंवा जालना शहरात होणारे स्थलांतर थांबून दिवसभर काम करून ते सायंकाळी या मेट्रो रेल्वेने परत घरी येऊ शकतील. त्यामुळे ही मेट्रो रेल्वे जालना शहरापर्यंत व्हावी.

-नितीन काबरा, उद्योजक, पोलाद स्टील, जालना

एमआयडीसी कॉरिडॉर निर्मितीसाठी ही मेट्रो रेल्वे उपयुक्त राहिली. शेंद्रा औद्योगिक वसाहतीपर्यंत प्रस्तावित मेट्रो रेल्वे जालन्यापर्यंत आल्यास ही रेल्वे औरंगाबाद आणि जालना औद्योगिक क्षेत्रासाठी मनुष्य बळ जोडणारी ठरेल. त्यामुळे शेंद्रा औद्योगिक वसाहतीपर्यंत प्रस्तावित असलेली मेट्रो ट्रेन ही जालना शहरापर्यंत आली पाहिजे.

-घनश्‍याम गोयल, उद्योजक, कालिका स्टील, जालना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT