अरगडे गव्हाण (ता. घनसावंगी) : येथील शेतकरी अशोक राजेजाधव यांच्या शेतातील टरबुजाचे पीक. 
मराठवाडा

‘बंदी’तही शोधली शेतकऱ्याने संधी

लक्ष्मीकांत कुलकर्णी

कुंभार पिंपळगाव (जि.जालना) - एकीकडे लॉकडाउनमुळे विस्कळित झालेली परिस्थिती, तर दुसरीकडे मागणीअभावी तोडणीला आलेली खराब होणारे टरबूज. हताश होऊन फळाकडे बघत बसण्यापेक्षा तीन छोटी वाहने लावून खेड्यापाड्यांत जाऊन, गल्लीबोळात, वाड्या-वस्त्यांवर घरोघरी जाऊन टरबूज विक्री करीत लॉकडाउनच्या बंदीतही अरगडे गव्हाण (ता. घनसावंगी) येथील शेतकरी अशोक राजेजाधव यांनी संधी शोधली. 

श्री. राजेजाधव शेतात नवनवीन प्रयोग करतात. ऊस, केळी, सीताफळ, मोसंबी, पेरू, जांभूळ, आंबे आदी फळबागांबरोबरच कांदा बियाणांचीही लागवड त्यांनी केली आहे. यावर्षी त्यांनी तीन एकर शेतात कृष्णा, मेलडी जातीच्या टरबुजाची लागवड केली आहे. यासाठी खत, बियाणे असा ४७ हजार रुपये खर्च झाला. टरबुजाची बाग बहरात आली; मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन झाले, माल खरेदीसाठी व्यापारी येईनात, फळे झाडावर खराब होऊ लागली.

खेड्यापाड्यांतही लोकांनी गावाच्या सीमा बंद केल्या तर परिसरातील मोठ्या गावांत फिरणे अवघड होते. एखाद्या ठिकाणी बसूनही माल विक्री करता येत नव्हता. तर दुसरीकडे फळाकडे बघितले की चिंता वाटत होती. किमान चार ते पाच लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते. या सर्व परिस्थितीत न डगमगता बंदीतही संधी कशी मिळेल, याकडे लक्ष दिले आणि दोन रिक्षा व एक पिकअप व्हॅनच्या साहाय्याने खेड्यापाड्यांत, गल्लीबोळात घराघरांपर्यंत जाऊन थेट ग्राहकांना घरपोच माल विकण्याचा निर्णय घेतला. दोन महिन्यांत एक लाख ७५ हजारांचे उत्पन्न मिळाले. 

चोहोबाजूंनी मार्ग खुंटलेला असतानाही हताश न होता फक्त १५ दिवसांत एक लाख ७५ हजारांचा माल विकला. विशेष म्हणजे सर्वसामान्य लोकांना कमी भावात चांगली फळे खायला मिळाली. कितीही अडचणी असल्या तरी जिद्द व आत्मविश्‍वास यातून मार्ग निघतोचं हा माझा अनुभव आहे. महिन्याला ८५ हजार रुपये मिळाले, आणखी काय पाहिजे. 
- अशोक राजेजाधव, शेतकरी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रायव्हरच्या बाजूला मान खाली घालून बसलेले मनोज जरांगे; तब्येत अचानक बिघडली, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू, नेमकं काय झालं?

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

Chamoli Tunnel Tragedy: ३० तासांनंतरही ३ मजूर बेपत्ता; बोगद्यातील साचलेले पाणी ठरतेय रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये मुख्य अडथळा

Marathi News Live Updates : पुण्यातील डेक्कन परिसरातील कॅफेत पहाटे कोयता गँगचा धुमाकूळ

Khambatki Ghat Traffic : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; पारगाव-खंडाळा परिसरात वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT