file photo 
मराठवाडा

परभणीकरांनो सावध रहा...! कोरोना पुन्हा डोके वर काढतो

गणेश पांडे

परभणी ः जिल्हयातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी होतोय असे वाटत असतांना अचानक पुन्हा रुग्ण संख्या झापाट्याने वाढत असल्याचे शासकीय आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. दोनशेच्या खाली आलेला रुग्णांचा आकडा परत दोनशेच्याही वर सरकल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परभणीकरांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सामाजिक अंतर राखून कोरोनापासून नागरीकांना स्वताचा बचाव करावा लागणार आहे.

परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणु संसर्गाचा प्रसार पुन्हा वाढत असल्याचे शासकीय आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मार्च पासून ते आता नोव्हेंबरच्या एक तारखेपर्यंत जिल्ह्यात 6 हजार 594 रुग्णांना कोरोना विषाणुची बाधा झालेली आहे. त्यापैकी 6 हजार 109 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दुर्देवाने 266 रुग्णांचा कोरोनाच्या विषाणुने जीव घेतला आहे. अद्यापही 219 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

परत ही रुग्ण संख्या वाढू लागल्याने चिंतेत भर

ऑक्टोबर महिण्याच्या शेवटच्या आठवड्यातील सुरुवातीचे दोन तीन दिवस रुग्ण संख्या कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे परभणीकरांनी सुटकेचा निस्वास सोडला होता. त्यामुळे बाजारात होणारी गर्दी परत वाढू लागली. रस्त्यावर अनेक जण समोरासमोर उभे राहून गप्पा मारतांना दिसत आहेत. कुणाच्या तोंडावर मास्क नाही तर कुणाच्या तोंडावर असुनही नसल्या सारखा असे चित्र सर्वत्र दिसत आहे. जिल्हा प्रशासन व महापालिकेच्या वतीने कितीही सांगून झाले तरी लोकांच्या मनापर्यंत ही गांभीर बाब पोहचलीच नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी परत रुग्णांची संख्य झपाट्याने वर जातांना दिसत आहे. 200 च्या खाली रुग्ण संख्या आलेली असल्याने लोकांना हायसे वाटत असले तरी आता परत ही रुग्ण संख्या वाढू लागल्याने चिंतेत भर पडली आहे.

सामाजिक अंतर राखावेच लागणार

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक काही दिवसापूर्वी झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ही 6 हजाराच्याही पार गेली. अजूनही लोकांना त्याचे गांभीर्य समजत नसल्याने रुग्ण संख्येचा ग्राफ  परत हळू हळू वर सरकतांना दिसत आहे. यावर एकच उपाय आहे तो म्हणजे सामाजिक अंतर राखणे व तोंडावर मास्क वापरणे. या दोन गोष्टी जरी परभणीकरांनी पाळल्या तरी आता आटोक्यात असलेली जिल्ह्याची परिस्थिती हाता बाहेर जाणार नाही.

भाजीबाजारातील शिस्त बिघडली

शहरातील क्रांती चौक, अष्टभुजा देवीमंदिरच्या मागील बाजूस व कृषी विद्यापीठ गेट समोर भाजीपाला विक्रेते मोठ्या संख्येने बसत असतात. कोरोनाचा भर सुरु असतांना या भाजीविक्रेत्यावर अंकुश बसविण्यात आला होता. पंरतू आता ती शिस्त परत बिघडल्याचे दिसून येत आहे. अनेक भाजीपाला विक्रेते स्वता मास्क वापरत नसल्याचे ही चित्र तिन्ही ठिकाणी दिसून येते. त्यामुळे महापालिका व पोलिसांना ही शिस्त परत लावावी लागणार आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT