Bharat Bandh In Jalna 
मराठवाडा

Bharat Bandh Updates : जालन्यात मार्केट सुरू, राजकीय पक्षांच्या पाठिंब्यानंतरही बंदला अल्पसा प्रतिसाद

उमेश वाघमारे

जालना :  केंद्र शासनाने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात मंगळवारी (ता.आठ) आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांकडून भारत बंदची हाक देण्यात आली होती. या आंदोलनाला जालना जिल्ह्यातील राजकीत पक्षांसह विविध संघटनांनी पाठिंबा दिला. मात्र, तरी देखील जालना शहरातील मार्केट सुरू होते. परिणामी या बंदला जालन्यात तरी प्रतिसाद मिळाले नसल्याचे चित्र पाहावयास मिळाले. उत्तर भारतात शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र, केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात ठोस पाऊले उचलण्यात आले नाही.

त्यामुळे मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली होती. त्यानंतर जालना जिल्ह्यातील काँग्रेस, शिवसेना या राजकीय पक्षांसह इतर पक्ष, संघटनांनी ही या बंदला जाहीर पाठिंबा दिला होता. त्यामुळे जालना शहरातील मार्केट मंगळवारी भारत बंदमुळे बंद राहिल असे वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात भारत बंदच्या या आंदोलनास जालना शहरात प्रतिसात मिळाला नाही. शहरातील मुख्य मार्केटसह शहरातील सर्वच भागातील दुकाने व्यापाऱ्यांनी सुरू ठेवले होते. अनेक व्यापाऱ्यांना आपले दुकाने अर्धवट उघडले होते. तसेच शहरातील कृषी केंद्र मात्र बंद होते. त्यामुळे शहरातील पाच ते दहा टक्के दुकाने भारत बंदच्या आंदोलनात बंद राहिल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. त्यामुळे जालना शहरात तरी भारत बंदच्या आंदोलनास प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र होते.


काँग्रेसची दुचाकी फेरी
काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी सकाळी दुचाकी फेरी कढून भारत बंद आंदोलनास पाठिंबा दिला आहे. मात्र, यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्षाचे उदोउदो करीत फेरीची सांगात केली. तसेच केंद्र शासनाच्या विरोधात ही घोषणाबाजी करण्यात आली.  

बाजार समिती बंद
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर कामगार संघटनाच्या मागणीनुसार जालना कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात होती. त्यामुळे सीसीआयची कापूस खरेदी वगळता इतर सर्व खरेदी-विक्री व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Kale Murder Case: काळे हत्येचा धागा आंदेकर टोळीपर्यंत? आरोपींची नावे अन् ‘कनेक्शन’ समोर... मोठी अपडेट

'विवेक मेरी माँ मर रही है' नॉन व्हेज खात शाहरुख मित्राला म्हणाला...'क्या तुम जानते हो विवेक?'

Pandharpur Kartiki Ekadashi: एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा; नांदेडचे वालेगावकर दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी

Pune Lawyers Protest : वकील उद्या लाल फीत लावून कामकाज करणार, वकील संरक्षण कायद्याची मागणी

भारताकडून अंडर १९ वर्ल्ड कप खेळलेल्या क्रिकेटपटूचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT