Hingoli sakal
मराठवाडा

Bharat Jodo Yatra : जल्लोषात ‘भारत जोडो’चे स्वागत

राहुल गांधींना पाहण्यासाठी उसळली गर्दी; हिवरा, चोरंबा फाटा येथे कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेड येथून जिल्ह्यातील हिवरा/चोरंबा फाटा येथे शुक्रवारी सायंकाळी दाखल झाली. यावेळी परिसरातील गावकऱ्यांनी स्व. खासदार राजीव सातव यांचे मित्र म्हणून ओळखले जाणारे राहुल गांधी यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा शुक्रवारी जिल्ह्यात दाखल झाली आहे. या यात्रेचे हिवरा/चोरंबा फाटा येथे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी कोल्हापूर येथील लेझीम पथक, झांज पथकाने व कोल्हापूर येथील ढोल- ताशा पथकाने उपस्थितांचे लक्ष वेधले होते. तसेच गोंधळ कलावंतही सहभागी झाले आहे.

हिवरा फाटा परिसरात असलेल्या हिवरा, वरुड, वरुडतांडा, डोंगरकडा, भाटेगाव, जामगव्हाण, महालिंगी, महालिंगी तांडा, सुकळीवीर, झुनझुनवाडीसह परिसरात येणाऱ्या गावातील गावकऱ्यांनी गर्दी केली होती. दरम्यान, राहुल गांधी हे स्व. राजीव सातव यांचे जवळचे मित्र म्हणून ओळखले जातात. त्यांच्या यंग बिग्रेडमध्ये राजीव सातव यांचा समावेश होता. राहुल गांधींचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे राजीव सातव २००८ मध्ये महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांनी २००९ मध्ये जिल्ह्यातल्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची पहिली निवडणूक जिंकली.

त्याच्या पुढल्याच वर्षी म्हणजे २०१० मध्ये त्यांच्याकडे युवा काँग्रेसची राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी सोपवण्यात आली. तब्बल चार वर्षे ते राष्ट्रीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष राहिले. त्यामुळे त्यांची राहुल गांधींशी जवळीक वाढली आणि ते राहुल ब्रिगेडच्या प्रमुख सदस्यांपैकी एक झाले होते. मोदीच्या लाटेत २०१४ साली मराठवाड्यात केवळ दोनच खासदार निवडून आले होते आणि त्यातील एक राजीव सातव होते.

यामुळे हिंगोली जिल्ह्यात स्व. राजीव सातव व राहुल गांधी यांची मैत्री परिचित आहे. यामुळे राहुल गांधींना पाहण्यासाठी परिसरातील गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी राहुल गांधी यांना राजीव सातव यांची आठवण येणार असून, जागोजागी लागलेली त्यांचे होर्डिंग, बॅनर व त्यावर असलेले संदेश भावनिक आहेत.

भारत जोडो यात्रा आज बाळापूरमध्ये

हिंगोली: काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा जिल्ह्यात दाखल झाली आहे. शनिवारी कळमनुरी तालुक्यातील शेवाळा पेट्रोल पंप येथून सकाळी ६.३० वाजता यात्रा पुढील प्रवासास निघणार आहे. आखाडा बाळापूर येथे यात्रेचे स्वागत होणार आहे. त्यानंतर आराटी शिवारातील लक्ष्मी पेट्रोल पंप येथे दुपारी ४.३० वाजता यात्रा थोडावेळ थांबून पुढील प्रवास करणार आहे. कळमनुरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर ७.३० वाजता कॉर्नर सभा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Mayor : यापूर्वी मुंबईमध्ये होऊन गेले आहेत भाजपचे महापौर! कोण होते प्रभाकर पै?

लेकी बनणार 'ग्लोबल शेफ'! हे सरकार मुलींना हॉटेल मॅनेजमेंटसाठी देणार स्कॉलरशिप; परदेशात प्रशिक्षणाचीही संधी

Ajit Pawar: ''बिर्याणीत गुळवणी कसं चालेल? अजित पवारांना सोबत यायचं असेल तर...'', शरद पवारांच्या मोठ्या नेत्याने सांगितल्या अटी

Kolhapur ZP : दोन आमदारांची ताकद दाखवत भाजपचा मोठा दावा; जि.प. निवडणुकीत ४० जागांची मागणी

ब्रेन स्ट्रोकशी झुंज अपयशी, प्रसिद्ध दिग्दर्शकांचं निधन, मराठी मनोरंजनसृष्टी हळहळली

SCROLL FOR NEXT