Bharat Ratna Swarsamrajni Lata Mangeshkar Sahityanagari Udgir Words are the cradle of literature sakal
मराठवाडा

शब्द हे साहित्याचे पैंजण

बालसाहित्यिकांनी साधला बालकांशी संवाद

विवेक पोतदार

भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी उदगीर : आईप्रमाणे साहित्यातून बालकावर संस्कार झाले पाहिजेत. बालकांना घडवण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे. माझ्या मुलीने मला बालसाहित्य लिहिण्यास प्रवृत्त केले. शब्द हे साहित्याचे पैंजण आहे. आपल्या मुलांना वाचनाकडे वळवा, त्यांना फुलू द्या कारण ते देशाच्या भविष्य आहेत, असे मत साहित्यिक विलास सिंदगीकर यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी आपली चौथीच्या पाठ्यपुस्तकातील ‘आभाळमाया’ ही कविता सादर करून टाळ्या मिळवल्या. येथील नथमलसेठ इन्नानी सभागृहात आयोजित ‘बालसाहित्यिकांशी संवाद व गप्पा’ या उपक्रमात रविवारी (ता.२४) बालकांनी सहभागी होऊन आनंद घेतला. अध्यक्षस्थानी साहित्यिक बालाजी मदन इंगळे होते. दत्ता डांगे, भगवानराव अंजनीकर, विलास सिंदगीकर सहभागी झाले होते.

यावेळी दत्ता डांगे म्हणाले, की एक कथा २२ लाख देऊ शकते हे अनुभवातून सांगतो. तीन आंधळे आणि एक डोळस ही कथा त्यांनी सादर केली. यात एक खालमान्या, दुसरा वरमान्या तर तिसरा डोळ्यावर पट्टी नांदणारा, चौथा डोळ्याचा उपयोग करणारा. आपल्या दृष्टीचा आपण उपयोग केला पाहिजे. चौफेर पाहिले पाहिजे, कलागुण जोपासले पाहिजेत. माझ्या यशातून हे खरे ठरले आहे. भगवान अंजनीकर म्हणाले, मुलांना संधी देऊन लिहिते केले पाहिजे. आजचे वातावरण चांगले नाही असे म्हणण्यापेक्षा मार्ग काढला पाहिजे. मुलांसंदर्भात उदासीन होऊ नका. बालाजी मदन इंगळे म्हणाले, साहित्य आपल्याला कसं जगायचं हे शिकवतं, आयुष्य समृद्ध करतं. आदर्श नागरिक बनवतं, जी मुले लिहितात त्यांना प्रेरणा द्या. दाद मिळावी म्हणून इतरांचे साहित्य घेऊ नका, ते स्वरचित असावे. मोबाइलपासून मुलांना बाहेर काढून वाचनाकडे वळवा. सूत्रसंचालन कु. श्रेया पुल्लागौर, कु.प्रज्योत चिकले यांनी तर आभार कु.अक्षदा पळनाटे हिने मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Zodiac Prediction 7 to 13 July: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

CA Result Success Story: रोज आठ ते दहा अभ्यासात जीव ओतून जिद्द व चिकाटीच्या जोरावर गेवराईच्या पृथ्वीराजचे 'सीए'परीक्षेत यश

SCROLL FOR NEXT