फोटो 
मराठवाडा

माहूर गडावर भविकाच्या बसने घेतला पेट...

प्रल्हाद कांबळे

नांदेड : माहूर गडावर शैक्षणिक सहलीसह भाविकांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. मुंबई येथील काही भाविक एका खासगी बसने माहुर गडावर देवदर्शनाला आले असता दत मंदीराकडे जात असताना शनिवारी (ता.२८) डिसेंबर रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजताच्या दरम्यान धावत्या बसला अचानक आग लागली. भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. 

डिसेंबर महिना व क्रिसमस नाताळाच्या सुट्ट्यामध्ये दरवर्षीच भाविक व शैक्षणिक सहली पर्यटक व देवस्थान असलेल्या आई रेणुका, भगवान दत्तप्रभू, माता अनुसया मातासह व जर्रा येथील शेख फरीद, वजरा येथिल धबधबा व रामगड किल्ला पाहण्यास मोठ्या प्रमाणात भाविक व विद्यार्थी माहुर गडावर येत असतात. मुंबई येथील ४० ते ४५ भाविक खाजगी बसने दत्तशिखर मंदिराकडे प्रवास करीत असताना रेणुका देवी मंदिरासमोरील गरूड गंगा पुलावरून पास झाल्यानंतर अचानकच बसच्या मागील टायरने पेट घेतल्याने भाविकांनी आरडाओरडा केल्याने बस थांबेपर्यत गाडीस चांगलीच आग लागली. 

नगरपंचायतीचे बंब घटनास्थळी

गडावर प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहण धारकांनी भाविकांना बसमधून सुरक्षित काढण्याचे काम केले व नगरपंचायतचे कार्यालयीन अधिक्षक वैजेनाथ स्वामी यांना भ्रमणध्वनीवरून ही घटना कळविल्याने त्यांनी तात्काळ अग्निशामक वाहन घटनास्थळावर पाठविले. वाहन चालक मन्सूरभाई, स्वच्छता दूत गणेश जाधव अग्निशामक दलाचे जवान व न. प. चे इतर कर्मचारी यांनी आग आटोक्यात आणली. या आगीत बस मागील दोन्ही टायर जळून खाक झाली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

चालकाच्या प्रसंगावधानाने जिवीत हानी टळली

माहूरच्या देवीचे दर्श करण्यासाठी मुंबई येथून आलेल्या एका सहलीच्या बसला अचानक आग लागल्याने टालकाने बस रस्त्याच्या कडेला थांबविली. सर्व भाविकांना त्यांनी खाली उतरण्यास सांगितले. लगेच पाणी व माती टाकून टायरला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविले. नुकतीच बीड जिल्ह्यात नांदेड ते पूणे जाणारी शर्मा ट्रॅव्हल्सला आग लागून ती बस जळू खाक झाली होती. यातही बस चालकांने प्रसंगावधान राखून रात्री दोनच्या सुमारास सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. अशा या वाहन पेटण्याच्या घटना वाढीस लागल्याने प्रवाशी वर्ग भयभीत झाले आहेत. अधिक प्रवास केल्याने गरमीमुळे टाययर पेटून आग लागत असल्याचे अग्नीशमन अधिकाऱ्यांनी बोलुन दाखविले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis Statement : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी मौन सोडलं, खात्यांचा पदभार सोपवला

IND U19 vs SL U19 SF Live: भारत-श्रीलंका सामना रद्द झाल्यास कोण जाईल फायनलला? बांगलादेशकडून पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम

Latest Marathi News Live Update : वैजापूरमध्ये बिबट्या विहिरीत अडकला

Epstein Files Explained : मोदी सरकार कोसळणार? एपस्टीन फाइल्स काय आहे, भारतातील नेते का घाबरले? संपूर्ण माहिती एका क्लिकवर...

Success Story: रामटेकच्या कार्तिक बावनकुळेचा युपीएससीत डंका; आयआयटी जमले नाही, युपीएससीला घातली गवसणी

SCROLL FOR NEXT