Bidkin-Chitegaon Road Sambhaji Nagar esakal
मराठवाडा

Bidkin-Chitegaon Road : बिडकीन-चितेगाव मार्गावर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबलंचक रांगा, काय आहे कारण?

या कामाचा नाहक त्रास वाहतूक कोंडीत अडकून प्रवाश्यांना तसेच वाहन चालकांना होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

चितेगाव ते बिडकिन‌ परिसरात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या खोदलेल्या नाल्यांना तलावाचे स्वरुप‌ आले असल्याचे चित्र दिसत आहे.

बिडकिन : छत्रपती संभाजी नगर ते पैठण रोडवरील (Sambhaji Nagar to Paithan Road) बिडकीन ते चितेगाव या ७ किलोमीटर रोडचे समांतर जलवाहिनी, तसेच रोड चौपदरीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू असल्याचा आरोप नागरिकांसह वाहनधारकांनी केलाय. गेल्या वर्षभरापासून पैठण ते छत्रपती संभाजी नगर महामार्गावर संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे जागोजागी समांतर जलवाहिनी टाकण्यासाठी किमान १५ ते १८ फुटाच्या नाल्या खोदून ठेवलेल्या आहेत, तर काही ठिकाणी पुलाची ही कामे अर्धवट रित्या सुरू आहेत.

या ७ किलोमीटरमध्ये ठेकेदाराने कुठेच गांभिर्यतेने काम केलेले नसून अर्धवट सोडलेल्या नालीमध्ये किमान १० फुटाच्या वर पाणी ही साचले आहे. अशातच ९ जून रोजी रात्री झालेल्या पावसाने बिडकीन-चितेगाव रोडवर (Bidkin-Chitegaon Road) चिखलाचे साम्राज्य झालेय. खोदून ठेवलेल्या रोडवर १० जून रोजी सकाळपासूनच जागोजागी वाहने फसलेली दिसून येत आहेत. यामुळे किमान सकाळी ९ वाजेपासून वाहतूक कोंडी होऊन वाहनचालक, तसेच प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठाचे सरन्यायाधीश रवींद्र घुगे व आर.एम.जोशी यांनी बिडकीनमध्ये प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता, दर्जेची पाहणी करीत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सदरील कामाला गती देत लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या होत्या. तरीही कामात हलगर्जीपणा करीत हम करे सो कायदा असं म्हणत काम संथ गतीने सुरू आहे. मात्र, या कामाचा नाहक त्रास प्रवाशांसह वाहन चालकांना होत आहे. प्रशासनाने या कामाकडे जातीने लक्ष देऊन समांतर जलवाहिनी, तसेच रोड चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी परिसरातील नागरिकांकडून मागणी होत आहे.

फारोळा पूल रात्रीत गेला वाहून

पावसाला सुरुवात झाली असताना फारोळा फाटा येथील पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पुलाचे बांधकाम, पुलाचे कठडे हे भरघाव वेगाने येत असलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते. जेसीबी व इतर यंत्राच्या साह्याने रात्रभर पाणी काढण्यासाठी प्रयत्न केले असता सकाळच्या सुमारास पुलावरुन काही प्रमाणात वाहने धावू लागल्याचे चित्र दिसून येत होते.

जलवाहिनीच्या नाल्यांना तलावाचे स्वरूप

चितेगाव ते बिडकिन‌ परिसरात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या खोदलेल्या नाल्यांना तलावाचे स्वरुप‌ आले असल्याचे चित्र दिसत आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारची कामे करत नसल्याने वाहनधारक व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

Teachers Agitation : सामूहिक रजा घेत शिक्षकांचे आंदोलन; पंचायत समितीवर मोर्चा, पाच तास धरणे आंदोलन, मुख्यालयाची अट शिथिल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT