natal 
मराठवाडा

परभणीसह पुर्णेतील चर्चमध्ये प्रभु येशुचा जन्मोत्सव 

सकाळ वृत्तसेवा

परभणी ः प्रभु येशुचा जन्मोत्सव अर्थात ख्रिसमस नाताळ परभणीत बुधवारी (ता.२५) उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहरातील सर्व चर्चमध्ये विशेष प्रार्थना घेण्यात आल्या. नाताळचा संदेश, प्रभु भजन, ख्रिसमस केकचे वाटप आदी कार्यक्रम या वेळी पार पडले.नाताळनिमीत्त मंगळवार (ता.२४) पासून परभणी शहरासह पुर्णेतील विविध चर्चमध्ये विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. 

नाताळच्या पूर्वसंध्येला शहरातील प्रमुख चर्च रोषणाईने उजळुन निघाले होते. बुधवारी (ता.२५) नारायण चाळ, अंसेब्ली ऑफ गॉडचर्च (दत्तनगर) सेंट अंगस्टी चर्चा (पोस्ट कॉलनी), सिएनआय चर्च (सरफराज नगर) यासह परसावत नगरातील  चर्चमध्ये विशेष प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले होते. तर ख्रिश्चन बांधवांच्या घरोघरी सजवलेले ख्रिसमस ट्री ठेवले होते. चर्चमध्ये प्रभु येशू ख्रिस्तांच्या जन्माचा देखावा तयार करण्यात आला होता. उपस्थित अनुयायांनी एकमेकांची गळाभेट घेऊन परस्परांना शुभेच्छा दिल्या. सरफराज नगर येथील फेथ असेंब्ली ऑफ गॉड चर्च येथे पास्टर डॅनीअल एस तारु यांनी प्रबोधन केले. दिवसभर शहरातील ख्रिश्चन बांधव चर्चमध्ये येत होते. (ता.एक) जानेवारीपर्यंत हे कार्यक्रम चालणार आहेत. 

हा दिला यंदाचा संदेश
दरवर्षी नाताळनिमीत्त धर्मगुरु उपस्थित भावीकांना सेदश देत असतात. यंदा सरफराज नगरातील फेथ असेंब्ली ऑफ गॉड चर्चमध्ये धर्मगुरु रेव्ह.डॅनियल एस.तारु यांनी संदेश दिला आहे. त्यांनी प्रभु येशु ख्रिस्तांचे आमच्या जीवनातील स्थान, महत्व, विचार यावर भाष्य केले. ते म्हणाले, परमेश्वराने आपल्या दैनंदिन जिवनात अध्यात्मिक जिवनात कसे सहाय करतो हे सांगितले. मनुष्याने संयम बाळगणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक मनुष्य शरीर जिवंत, पवित्र, ग्रहणीय अशा प्रकारे परमेश्वराला समर्पित करावी, असे त्यांनी सांगितले. या वेळी केक कापुन जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

प्रेम व शांतीतूनच जगाचे कल्याण होवू शकते
पूर्णा ः प्रेम व शांतीतूनच जगाचे कल्याण होवू शकते म्हणून तोच मार्ग प्रभू येशूने दाखविला आहे. त्यानुसार प्रत्येक मनुष्यप्राण्याने चालावे त्यातच सर्वांचे हित आहे, असे प्रतिपादन रेव्हरंड श्रावण कामठे यांनी प्रार्थना सभेत केले. मेथॉडिस्ट चर्चमध्ये ‘प्रभू येशू’चा जन्मोत्सव बुधवारी (ता.२५) उत्साहात साजरा करण्यात आला. 

फटाक्यांची आतषबाजी
या वेळी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मध्यरात्री बारा वाजता ख्रिसमसची विशेष प्रार्थना व सांताक्लॉजच्या हस्ते भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी केक कापण्यात आला. सकाळी अकरा वाजता प्रार्थना व ख्रिसमस संदेश रेव्हरंड श्रावण कामठे यांनी दिला. या वेळी जेम्स पाटोळे, जॉन जोजेफ, सॅमसन जेम्स, डेव्हिड दाभाडे, भास्कर आहिरे, नारायण कदम, सॅम्युएल अल्हाट, लूद जोजेप उपस्थित होते.

पुर्णेतील या चर्चमध्ये झाले कार्यक्रम
युनायटेड ख्रिश्चन असोशिएशनच्या वतीने नाताळनिमित्ताने विविध सांस्कृतिक स्पर्धा व खेळांचे तसेच अन्नदानाचे आयोजन करण्यात आले. पास्का चर्चमध्ये फादर वॉल्टन गोन्सालवीस व फादर जिथिन डेविस यांनी रात्री बारा वाजता व सकाळी साडेआठ वाजता पवित्र मिसा केली. अकरा वाजता मिठाई वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने गोठ्याची सुंदर सजावट करण्यात आली होती. २० डिसेंबर पासून शहरातील तीनही चर्चचे फादर रेव्हरंड श्रावण कामठे, फादर वाल्टन गोन्सालवीस, फादर जिथिन वॉल्टन व पास्टर सुनीलकुमार शमाकरराव यांनी शहरात प्रभू येशूचा संदेश पोहचविण्याचे कार्य केले. रूथ प्रार्थना भवनमध्ये पास्टर के. सुनीलकुमार यांनी विशेष प्रार्थना केली. येथेही मोठी सजावट करण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari and Next PM : ''म्हणून मोदींनंतर गडकरीच पंतप्रधान...''; काँग्रेस नेत्याने केलंय मोठं विधान!

Viral News : कारागिराने जबड्यात लपविले 15 लाखांचे सोने, पण 'या' एका चुकीमुळे उघड झाली चोरी

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

SCROLL FOR NEXT