41Mum_BJP_beats_Sena_BMC_byel_10 
मराठवाडा

नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी, बीड जिल्ह्यातील प्रभारींच्या निवडी घोषित

सकाळ वृत्तसेवा

बीड : आगामी वर्षाच्या पहिल्याच महिन्यात जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या पाचही नगरपंचायतीवर कमळ फुलविण्यासाठी भाजपचे मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यासाठी निवडणूक प्रभारीच्या निवडी जाहीर करण्यात आल्या असून आमदार लक्ष्मण पवार, डॉ. स्वरुपसिंह हजारी, सर्जेराव तांदळे, राजाभाऊ मुंडे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली.

नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात जिल्ह्यातील वडवणी, आष्टी, पाटोदा, शिरूर, केज येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. राज्यात तीन पक्षाचे सरकार असल्याने वरील नगरपंचायती ताब्यात घेण्यासाठी जिल्ह्यातील भाजपने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. यासाठी प्रत्येक नगरपंचायतीसाठी अनुभवी प्रभारीची निवड करण्यात आली आहे. हे प्रभारी निवडणुकीसाठी योग्य उमेदवारांची चाचपणी करून त्यांची नावे वरिष्ठांकडे पाठवणार आहेत.



कुठे कोणाची निवड
------
वडवणी नगरपंचायत – आमदार लक्ष्मण पवार.
केज नगरपंचायत – राजेंद्र मस्के.
पाटोदा नगरपंचायत – डॉ. स्वरुपसिंह हजारी.
आष्टी नगरपंचायत - अॅड. सर्जेराव तांदळे.
शिरूर नगरपंचायत - राजाभाऊ मुंडे

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT