शिवाजी जाधव 
मराठवाडा

भाजप हिंगोली जिल्ह्यातील १५० गावात कोरोनासंबंधी करणार सेवाकार्य- ॲड. शिवाजी जाधव

जिल्हाध्यक्ष ॲड. जाधव यांनी सांगितले की, हिंगोली जिल्ह्यातील १५० गावांमध्ये ता. ३० मे रोजी भाजपचे कार्यकर्ते भेट देतील. त्या गावांमधील आशा सेविका आणि कोरोनाच्या साथीचा सामना करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा पक्षातर्फे सत्कार करण्यात येईल.

प्रल्हाद कांबळे

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारला ता. ३० मे रोजी सात वर्षे पूर्ण होत असून त्या दिवशी भाजप हिंगोली जिल्ह्यामधील १५० गावांमध्ये कोरोनासंबधी सेवाकार्य करणार आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष ॲड. शिवाजी जाधव यांनी दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेली स्थिती ध्यानात घेता कोणताही उत्सव होणार नाही, असेही ते म्हणाले.

जिल्हाध्यक्ष ॲड. जाधव यांनी सांगितले की, हिंगोली जिल्ह्यातील १५० गावांमध्ये ता. ३० मे रोजी भाजपचे कार्यकर्ते भेट देतील. त्या गावांमधील आशा सेविका आणि कोरोनाच्या साथीचा सामना करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा पक्षातर्फे सत्कार करण्यात येईल. गावामध्ये भाजपाचे कार्यकर्ते कोरोनासंबंधी सेवाकार्य करतील. त्यामध्ये आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, माजी आमदार रामराव वडकुते, बाबाराव बांगर यांचा समावेश असेल.

हेही वाचा - अनुभवाच्या शिदोरीतून मुदखेड शहराचा विकास करणार- प्रशांत पाटील

जिल्ह्यातील भाजपचे सर्व आमदार, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह सर्व कार्यकर्ते सेवाकार्यात सहभागी होतील. पक्षातर्फे कोरोनाच्या संकटात सातत्याने सेवाकार्य चालू आहे. पक्षातर्फे ३० मे चा दिवसही विशेष सेवाकार्य करुन साजरा करण्यात येणार आहे. कोरोनासंबंधी सर्व नियमांचे पालन करुन आणि प्रशासनाला सहकार्य करुन हा उपक्रम होईल.

भाजपाच्या युवा मोर्चा, महिला मोर्चा, किसान मोर्चा अशा सर्व मोर्चांचे कार्यकर्ते ता. ३० रोजी रक्तदान शिबीरांचे आयोजन करणार आहेत. तसेच जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा, सेनगाव या शहरांमधील सेवावस्त्यांमध्ये विशेष सेवाकार्य करण्यात येईल.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT