कुसळंब (ता. पाटोदा) : येथे आयोजित कार्यक्रमात प्रवीण दरेकर, सुरेश धस.  
मराठवाडा

पुन्हा भाजपचे सरकार येईल....सुरेश धस मंत्री बनतील! प्रवीण दरेकरांची भविष्यवाणी... 

सुधीर एकबोटे

पाटोदा (जि. बीड) - सध्याचे महाविकास आघाडीचे सरकार अल्पकाळ टिकणार असून राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येईल आणि सुरेश धस कॅबीनेट मंत्री होतील, कर्तृत्वान सुरेश धस हे जिल्ह्याचेच नाही तर राज्याचे नेते म्हणून कारकीर्द गाजवतील, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले.

बीड जिल्ह्यातील कुसळंब (ता. पाटोदा) येथे रविवारी (ता. दोन) आमदार सुरेश धस यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन कार्यक्रमात श्री. दरेकर बोलत होते. यावेळी सुरेश धस यांच्यासह नेत्यांची उपस्थिती होती. राज्यात तीन पक्षांचे सरकार हे महाविकास आघाडी नाही तर बिघाडी असल्याचा टोलाही लगावत हे सरकार फार काळ टिकणारे नाही, असे दरेकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले, की विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता मी असलो तरी शेती-मातीच्या प्रश्नाचे मार्गदर्शन आमदार सुरेश धसच करतात. जनसंपर्क, कार्यकर्ता जोडण्याची हातोटी, सामान्यांबद्दल आपुलकी आणि नेतृत्व घडवणारा नेता म्हणून सुरेश धसांची ओळख आहे. एवढेच नाही तर मला विरोधी पक्षनेता सुरेश धस यांनीच केले आहे. 

बॅंक प्रकरणात धस मंत्री असताना तारांकित प्रश्‍नावर क्‍लीन चिट दिल्याचा उल्लेखही त्यांनी केला. कोणतीही परिस्थिती बदलण्याची ताकद धसांत आहे, असेही ते म्हणाले. भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेश पोकळे, दिलीप गोरे, जयदत्त धस, मोहन जगताप, ऋषिकेश अडसकर आदींची उपस्थिती होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT