तुळजापूरात (जि.उस्मानाबाद) -भाजपच्या वतीने मंदिर उघडावे यासाठी शंखनाद आंदोलन तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारासमोर करण्यात आले. 
मराठवाडा

तुळजाभवानी मंदिरासमोर काळी गुढी उभारुन शंखनाद आंदोलन

जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) - तुळजाभवानी मंदिर उघडावे, या मागणीसाठी सोमवारी (ता.३०) तुळजाभवानी मंदिरासमोर काळी गुढी उभारून शंखनाद आंदोलन पावसात दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास करण्यात आले. तुळजाभवानी मंदिर उघडावे या मागणीसाठी महाद्वारासमोर शंखनाद भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे सरकार मालामाल, मंदिर बंद, उघडले बार, उद्धवा धुंद तुझे सरकार अशी टीका यावेळी करण्यात आली. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, सरकार केवळ जेथे महसूल मिळतो तेच उद्योगधंदे चालू ठेवत आहेत.

त्यासाठी यांना बार, बस, रेल्वे, हॉटेल आदी ठिकाणे उघडी करता येते. पण मंदिर का उघडता येते नाही. तुम्हाला जर मंदिर उघडायचे नसेल तर ज्यांची उपजीविका मंदिरावर आहे. त्यांना अर्थसाह्य करावे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी महिला आघाडीच्या विद्या माने, देवकन्या गाडे, जिल्हा चिटणीस गुलचंद व्यवहारे, आनंद कंदले, नारायण ननवरे, दत्ता राजमाने, विकास मलबा, बाळासाहेब शामराज, शिवाजी बोधले, प्रसाद पानपुडे, गिरीश देवळालकर, उमेश गवते, सागर कदम, सागर पारडे आदी उपस्थित होते. यावेळी राजाभाऊ गायकवाड यांनी संबळ वाजविले. या आंदोलनासंदर्भात पोलिसांनी आंदोलन केवळ पंधरा मिनिटे झाले असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pension Service : पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी ! आता बँकेत न जाताच घरबसल्या मिळणार लाइफ सर्टिफिकेट सेवा! जाणून घ्या कशी?

IPL 2026 Update: काव्या मारनचा धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत, असं करण्याची खरच गरज आहे का? सनरायझर्स हैदराबाद...

Latest Marathi News Live Update : मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा खडाजंगी

Rahul Dravid Son: द्रविडचा धाकटा लेक गाजवतोय मैदान; BCCI च्या वनडे स्पर्धेसाठी झाली संघात निवड

Mumbai News: अबू जुंदालविरुद्ध खटला होणार सुरू, २६/११ दहशतवादी हल्ला प्रकरण

SCROLL FOR NEXT