पंकजा मुंडे यांच्या घरासमाेर जमलेले कार्यकर्ते. 
मराठवाडा

पंकजा मुंडेंच्या घरासमोर राडा, परळीत धरपकड

सकाळ वृत्तसेवा

परळी वैजनाथ (जि. बीड) - राज्याच्या माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व पन्नगेश्‍वर साखर कारखान्याच्या अध्यक्ष प्रज्ञा मुंडे यांच्या यशश्री निवासस्थानी भाजप व मनसे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आंदोलनावरून सोमवारी (ता. 17) हाणामारी झाली. 

पन्नगेश्‍वर साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या थकीत ऊसबिलासाठी कारखान्याच्या अध्यक्ष प्रज्ञा मुंडे व माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानासमोर सोमवारी मनसे शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

आंदोलनास पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली होती; पण मनसे आंदोलनावर ठाम होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलनकर्ते व भाजप कार्यकर्ते याच कारणावरून एकमेकांना भिडले. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील प्रसंग टळला. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: RBIचा मोठा निर्णय! रेपो दर किती? तुमच्या लोन, EMI आणि FDवर काय परिणाम? महागाई वाढणार?

CIDCO House: सर्वसामान्यांना स्वप्नातलं घरं मिळणार, सिडको १९ हजार घरे बांधणार; पण कुठे आणि कधी?

Iran-US Ceasefire : अमेरिका-इराणमध्ये शस्त्रसंधीची घोषणा होताच कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

Latest Marathi News Live Update: मुक्ताईनगर ते कु-हा मार्गावर पुन्हा वाघाचे दर्शन, वाहनधारकांची उडाली तारांबळ

Video Viral : शार्दूल ठाकूरने बाद करताच वैभव सूर्यवंशी ढसाढसा रडला; तो फटका का खेळला? स्वतःवरच चिडला

SCROLL FOR NEXT