file photo 
मराठवाडा

विहिरीत आढळला महिलेसह मुलीचा मृतदेह

सकाळ वृत्तसेवा

जिंतूर (जि. परभणी) : मानकेश्वर (ता. जिंतूर) शिवारात एका शेतातील विहिरीत पंचवीसवर्षीय विवाहिता व एकवर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. सदरची घटना बुधवारी (ता. २२) सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह जिंतूर ग्रामीण रुग्णालयाच्या शवागारात ठेवले असून सायंकाळपर्यंत मृतदेहाची ओळख पटली नाही.

जिंतूर शहरातील गोविंद तोष्णीवाल यांची माणकेश्वर शिवारातील (गट क्रमांक २१०) शेतांमधील विहिरीवर बुधवारी (ता. २२) सकाळी सातच्या सुमारास त्यांचा बटाईदार काळूराम आडे हा पाण्याची मोटार चालू करावयास गेला असता त्यांना विहिरीतील पाण्यात लहान मुलीचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले. त्यांनी या बाबतची माहिती गोविंद तोष्णीवाल यांना दिली. तोष्णीवाल यांनी लगेचच पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक शेख अहमद व पोलिस जमादार सय्यद साजिद यांना घटनास्थळी पाठविले. त्यांनी पाण्यावर तरंगत असलेल्या मुलीचा मृतदेह बाहेर काढला. त्या वेळी त्यांना विहिरीशेजारी एका महिलेची चप्पल व एक साडी असलेली थैली आढळून आल्याने त्यांनी विहिरीतील पाण्यात शोध घेतला असता त्यांना पंचवीसवर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आला.
दोन्ही मृतदेहाची ओळख न पटल्याने ते ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले. दरम्यान, गावातील महिला हरवली किंवा घरातून बाहेर गेली असल्यास त्यांनी जिंतूर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी केले. मृतदेहाची ओळख पटल्याशिवाय, नातेवाईक पुढे आल्याशिवाय घटनेचे कारण सांगता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.


हेही वाचा ....


 महिलेची गळफास घेऊन आत्महत्या


पूर्णा (जि. परभणी) ः गौर (ता. पूर्णा) येथील अनसूयाबाई सुभाष जोगदंड (वय ५०) या महिलेने मंगळवारी (ता. २१) घराच्या छ्ताला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी चुडावा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुभाष बाबूराव जोगदंड यांनी दिलेल्या माहितीवरून त्यांची पत्नी अनसूयाबाई सुभाष जोगदंड (वय ५०, रा. गौर ता. पूर्णा) यांनी मुलाला दारू पिण्याचे व्यसन लागले असून याचा ताण घेऊन मंगळवारी (ता.२१) मध्यरात्री राहत्या घरी छताच्या हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केली. चुडावा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस शिपाई सुजलोड हे करीत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricketer Retirement : चार वेळचा IPL चॅम्पियन खेळाडूची निवृत्तीची घोषणा! म्हणाला, 'आता खेळण्याला काहीच अर्थ नाही...'

Paithan Crime: पाचोडजवळ टोलवर राडा! वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला; आठ संशयित ताब्यात

Swing Accident: अभ्यासात हुशार, वडिलांच्या दुकानात मदतीचा हात; झोक्याच्या दुर्घटनेत ११ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू

Lonavala Tourism: पाऊस पडतोय अन् मावळ सजतोय! धबधबे, घाट, किल्ले अन् धरणांचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Sugar Stock Limit: मिठाई विक्रेत्यांनो लक्ष द्या! साखर साठवणुकीचा नवा नियम, अतिरिक्त साठा ठेवल्यास कारवाई होणार, मर्यादा किती?

SCROLL FOR NEXT