file photo 
मराठवाडा

व्हिडिओ कॉलवरून घेतले अंत्यदर्शन 

कृष्णा पिंगळे

सोनपेठ  (जि. परभणी) : कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार उडाला असून हॉट स्पॉट असणाऱ्या पुण्यात राहणाऱ्या असंख्य कुटुंबांवर ओढवलेल्या संकटांना तोंड देण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकदेखील माणुसकीचे दर्शन घडवत आहेत. 

असाच काहीसा प्रकार कोठाळा (ता. सोनपेठ, जि. परभणी) येथील द्वारकाबाई चांभारे यांचे पुणे येथे ता. २६ एप्रिलला निधन झाले. लॉकडाउनमुळे गावी अंत्यसंस्कार करण्या ऐवजी पुणे येथेच अंत्यसंस्कार करून गावकरी व नातेवाईक व्हिडिओ कॉलवरून सहभागी झाले होते.
अंत्यसंस्कार हे मृताच्या मुळगावी व्हावे, असा प्रघात आहे. नातेवाईकही अंत्यसंस्कार मूळ गावी करण्यावर भर देतात. दु:खद प्रसंगात सर्व नातेवाईक एकत्र येऊन एकमेकांना धीर देतात. पण कोविडच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाउन असल्याने सर्वत्र वाहतूक व जिल्हाबंदीमुळे फक्त अत्यावश्यक कारणासाठीच प्रवासाची परवानगी देण्यात येत आहे.

उपचारादरम्यान निधन
 कोठाळा (ता. सोनपेठ, जि. परभणी) येथील द्वारकाबाई शिवाजी चांभारे (वय ६६) यांचे पुणे येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या मुला-मुलींची आईचा अंत्यसंस्कार गावाकडे व्हावा, अशी इच्छा होती. परंतु, गावातील कारभारी चांभारे, ग्रामसेवक भोसले, तलाठी कुकडे, पोलिस पाटील व प्रतिष्ठित नागरिक यांनी सद्यःस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग आणि त्याचा प्रादुर्भाव पाहता पुणे येथून संबंधित सर्वांनी इथे येणे आणि तो कार्यक्रम होणे हे किती जिकिरीचे आणि धोक्याचे असू शकते, याची जाणीव संबंधित कुटुंबाच्या लोकांना करून दिली. 

कोठाळा ग्रामस्थांनी निर्माण केला आदर्श
दुःखाच्या प्रसंगातही त्या गोष्टीचे सामाजिक भान ठेवत आपल्या आईचे शेवटचे दर्शन कोठाळा ग्रामस्थांना मोबाइलच्या माध्यमातून घडवून आणले. गावाकडे येण्याचा अट्टाहास न करता अंत्यविधीचा कार्यक्रम पुणे येथे करण्यात आला.  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चांभारे कुटुंबाने दुःखातही उचललेले हे पाऊल नक्कीच सर्वांकरिता एक आदर्श आणि दिलासा देणारे ठरणार आहे, यात शंका नाही. 

 सहकार्य केल्याबद्दल आभार
कोविड - १९ च्या पार्श्वभूमीवर चांभारे कुटुंबीयांनी घेतलेला निर्णय हा तालुक्यातील नागरिकांसाठी आदर्शच आहे. दुःखाचा डोंगर कोसळल्यावरदेखील संकटकाळी सामाजिकतेचा संदेश त्या कुटुंबाने दिलेला आहे. तसेच सोशल मीडियाचा स्तुत्य उपयोग करून प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार तसेच द्वारकाबाई चांभारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. 
- सचिन खुडे, गटविकास अधिकारी, सोनपेठ (जि. परभणी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT