हिंगोली ः शहरातील शासकीय कार्यालयासमोर बुक स्‍टॉल 
मराठवाडा

पुस्‍तक विक्रीतून युवकाचा प्रपंच...   

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली ः दोन पिशव्यांत पुस्‍तके विक्रीसाठी नेऊन व्यवसाय सुरू केल्यानंतर एक व्हॅन खरेदी करून फिरता स्‍टॉल उभारला. अनेक शहरात त्‍यांची विक्री सुरू केल्याने नफ्यामधून घरचा प्रपंच चालविला जात आहे. दोन बॅगमध्ये बसतील एवेढी पुस्‍तके विकता विकता आता व्हॅनमधून त्‍याची विक्री केली जाते. यामुळे शिक्षणाची प्रक्रिया निरंतर सुरू ठेवण्याचा प्रयत्‍न केला जातो.

पुसद तालुक्‍यातील रोहडा येथील रामेश्वर वाठ हे हिंगोली शहरातील विविध शासकीय कार्यालये व मुख्य रस्‍त्‍यावर सावलीच्या ठिकणी फिरते बुक स्‍टॉल उभारून पुस्‍तकांची विक्री करीत आहेत. श्री. वाठ हे पदवीधर असून त्‍यांनी यापूर्वी एका बुक स्‍टॉलवर पुसद येथे नोकरी केली. घरची परिस्‍थिती बेताचीच असल्याने पुस्‍तक व्रिकीचे काम सुरू केले.

पुस्‍तक विक्रेत्यांच्या ओळखी
येथे काम करीत असताना स्‍टॉलसाठी लागणारे पुस्‍तक खरेदीसाठी औरंगाबाद, पुणे, मुंबई, शहरात नामवंत प्रकाशनाची पुस्‍तके घेण्यासाठी त्याने जावे लागत होते. या स्‍टॉलवर येण्या-जाण्यामुळे त्यांच्या विविध नामवंत शहरातील पुस्‍तक विक्रेत्यांच्या ओळखी झाल्या, त्‍यामुळे काही दिवस या दुकानावर काम करून कामाचा अनुभव घेतला व स्‍वतंत्र बुक स्‍टॉल उभारण्याचा निर्णय घेतला. हनुमान बुक सेंटर नावाने पुस्‍तक विक्रीचे स्‍टॉल सुरू केले. हातावर हात ठेवून बसायचे नाही, असा विचार करून पुस्‍तक घेऊन मोठ्या शहरात जाण्याचे ठरविले. त्‍याप्रमाणे पिशवीत भरून शासकीय कार्यालये, चौकात बसून त्‍याचे स्‍टॉल उभारून त्‍याची विक्री करणे सुरू केले.

ग्राहकांना दहा ते पंधरा टक्‍के खरेदीवर सूट
हळुहळू बाजारात जम बसत गेला व आता इतरही शहरात पुस्‍तके घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. मागच्या काही वर्षांपासून यवतमाळ जिल्‍ह्यासह बुलडाणा, वाशीम व आता हिंगोली जिल्‍ह्यात फिरते स्‍टॉल सुरू केले आहेत. ग्राहकांना दहा ते पंधरा टक्‍के सूट दिली जाते. यामुळे विक्री अधिक होते. त्‍यांच्या स्‍टॉलवर शैक्षणिक, स्‍पर्धा परीक्षा, कायदेविषयक, चालू घडामोडी, शेतीविषयक, राजकीय, समाजिक, थोरांची आत्‍मचरित्रे यासह कादंबरी, कथा आदी प्रकारची पुस्‍तके आहेत. ही पुस्‍तके वाहनात ठेवून गावोगाव मुख्य रस्‍त्‍यावर स्‍टॉल उभारून त्‍याची विक्री केली जात आहे. एकदा घराच्या बाहेर पडल्यावर पधंरा दिवस किमान घरी परत जाता येत नाही. मात्र, संसार सुरळीत सुरू असल्याचे समाधान मिळते.

खर्च वजा जाता घरचा प्रपंच चालतो
दोन बॅगमध्ये पाठीवर पुस्‍तके विकता विकता आज व्हॅनमधून फिरता स्‍टॉल उभारून त्‍याची विक्री केली जाते. वाचनाची निरंतर प्रक्रिया सुरू राहावी यासाठी सूटही देतो. यामुळे खर्च वजा जाता घरचा प्रपंच चालतो, यातच समाधानी आहे. - रामेश्वर वाठ, पुस्तक विक्रेता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT