file photo 
मराठवाडा

लाचखोर हवालदार लाचेच्या जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : मुरूम व गीट्टी वाहतुक करण्यासाठी टीप्परला परवानगी देतो म्हणणारा पोलिस हवालदार चार हजाराच्या लाचप्रकरणी एसीबीच्या जाळ्यात अडकला. त्याने टीप्पर चालकाकडून चार हजार रुपये घेण्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. १३) जानेवारी रोजी केली. 
नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गीट्टी व मुरूम वाहतुक करणाऱ्या टीप्परला परवानगी देतो असे म्हणून नांदेड ग्रामिणचा हवालदार नामदेव नागोराव ढगे यांनी प्रति टीप्परमागे तिन हजार असे चार टीप्परचे १२ हजार रुपयाची लाच मागितली. मात्र तडजोडीअंती चार हजार रुपये देण्याचे ठरले. 

लाचेची मागणी पडताळणीत निष्पन्न

परंतु ही लाच देण्या इच्छा नसलेल्या तक्रारदाराने रविवारी (ता. १२) लाचलुचपत प्रतिबंधक विभागात येऊन लाच मागणाऱ्या हवालदाराविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिस उपाधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शेषेराव नितनवरे यांच्या पथकानी शासकिय पंचासमक्ष केलेल्या लाच पडताळणी सापळ्यात हवालदाराने चार हजाराची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. यावरून पोलिस निरीक्षक श्री. नितनवरे यांनी सोमवारी (ता. १३) दुपारी नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन नामदेव ढगेविरुध्द कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम (संशोधन) - २०१८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास श्री. नितनवरे करीत आहेत. 

यांनी घेतले परिश्रम

हा सापळा यशस्वी करण्यासाठी पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस उपाधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शेषेराव नितनवरे, पोलिस नाईक हनमंत बोरकर, किशन चिंतोरे, गणेश केजकर, अमरजितसिंग चौधरी आणि मारोती सोनटक्के यांनी परिश्रम घेतले. 
  
नागरिकांना आवाहन

जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, शासकिय अधिकारी किंवा कर्मचारी हे शासकिय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असतील किंवा लाचेच्या मागणीचे मोबाईल फोनवर लोकसेवक  यांचे एसएमएस, व्हिडीओ आणि आॅडीओ क्लीप असल्यास भ्रष्टाचार संबंधाने काही माहिती असल्यास आमच्याशी संपर्क साधावा. तसेच माहिती अधिकारात शासकिय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी शासकिय निधीचा भ्रष्टाचार केला असेल तर टोलफ्री हेल्पनाईन क्रमांक- १०६४ व कार्यालयाचा फोन क्रमांक ०२४६२- २५३५१२ यावर किंवा पोलिस उपाधिक्षक विजय डोंगरे यांचा चळभा, क्रमांक ८९७५७६९९१८ या क्रमांकावर संपर्क साधावे.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

Agriculture Day 2026: नेमका कधी आणि कसा सुरू झाला 'महाराष्ट्र कृषी दिन' ?

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

SCROLL FOR NEXT