2Corona_1 
मराठवाडा

उस्मानाबादेत ब्रिटनहून परतलेल्या एकाला कोरोनाची लागण, जिल्हा आरोग्य प्रशासन झाले दक्ष

तानाजी जाधवर

उस्मानाबाद : येथे लंडनहुन परतलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची निष्पन्न झाले आहे. त्याची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्याचा स्वॅब घेऊन पुण्यामध्ये तपासणीसाठी पाठविला जाणार आहे. या रुग्णाकडे जिल्हा आरोग्य प्रशासनाने अधिक लक्ष दिले आहे.  हा रुग्ण लंडन येथून मुंबई विमानतळावर २१ डिसेंबर रोजी आल्याची नोंद आहे. त्यानंतर ते त्यांच्या मुंबईच्याच मित्राच्या घरी राहण्यासाठी गेले. तिथे दोन दिवस राहिल्यानंतर ते उस्मानाबादला २३ डिसेंबरला आले. या रुग्णाची मुंबईच्या विमानतळावर टेस्ट केल्यानंतर तो निगेटिव्ह आला होता. मात्र त्यानंतर त्याना किरकोळ ताप व सर्दी जाणवत असल्याने त्यांना घरीच वेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले होते.

त्यांचा प्रत्यक्ष कोणाशी संपर्क आलेला नसला तरी कुटुंबातील सदस्यांशी अप्रत्यक्षरित्या संपर्क आल्याचे दिसुन आले आहे. लक्षणे जाणवत असल्याचे पाहुन रुग्णांने स्वतः आपल्या कारमध्ये येऊन जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झाला. शनिवारी(ता.दोन) रोजी त्यांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली. त्यावेळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे दिसून आले. त्या रुग्णाच्या बाबतीत जिल्हा रुग्णालयाची टीम अत्यंत दक्ष असुन त्यांना वेगळ्या रुममध्ये ठेवण्यात आले आहे. त्या रुग्णाची परिस्थिती अत्यंत चांगली असुन प्रकृती उत्तम आहे.

रुग्णाचा स्वॅब पुण्याला पाठविण्यात आल्यानंतर त्या अहवालावरुनच तो कोणत्या प्रकारचा कोविड आहे. हे लक्षात येणार आहे. त्यामुळे सध्यातरी या रुग्णामुळे जिल्हा रुग्णालयासह नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईमध्ये आल्यानंतर निगेटिव्ह आल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी मधल्या काळात ही बाधा झालेली आहे की, पूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचे उत्तर सध्या तरी कोणाकडेच नाही. नवीन कोरोनाची पसरण्याचे प्रमाण हे अत्यंत जलद व मोठ्या संख्येने असल्याचा दावा या अगोदरच केलेला आहे. त्यामुळे रुग्णांचा संपर्क होणार नाही याची काळजी घेण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.


संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Daily Horoscope : राशिभविष्य - साेमवार १६ नोव्हेंबर २०२६

Share Market: शेअर, म्युच्युअल फंड व्यवहार थेट प्राप्तिकर विवरणपत्रात!

Cheese Butter Toast Recipe: सोमवारच्या धावपळीत झटपट बनवा बटर चीज टोस्ट; अवघ्या १० मिनिटांत तयार होईल कुरकुरीत आणि चविष्ट नाश्ता!

SIP Investment: ‘एसआयपी’ गुंतवणूकदार : पुन्हा एकदा विजेता!

Ration Card Separation: रेशनकार्ड विभक्त केल्यावर धान्य बंद! धान्य सुरू करण्यासाठी 'हा' दाखला बंधनकारक; नवे रेशनकार्ड ३० दिवसांत

SCROLL FOR NEXT