BRS in Maharashtra beed mns leader shivraj bangar joins k chandrashekar rao brs party  
मराठवाडा

BRS in Maharashtra : बीआरएसचा बीडमध्येही शिरकाव; माजी नगराध्यक्षांसह मनसे नेत्यांचा प्रवेश

रोहित कणसे

बीड : तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर रावयांच्या भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात हात-पाय पसरणे सुरू केले आहे. केसीआर यांच्या पक्षात सध्या मोठ्या प्रमाणत इंनकमिंग होतानाचे चित्र पाहायला मिळता आहे. बीडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खिंडार पडल्याचं पाहायला मिळालं.

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात केसीआर यांच्या पक्षाचा प्रभाव सध्या वाढताना दिसत आहे. नुकतेच बीड येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ऊसतोड मजूर सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवराज बांगर तसेच माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे यांनी देखील बीआरएस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. हैदराबाद येथे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेत त्यांनी पक्षात प्रवेश केला.

हेही वाचा- सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

शिवराज बांगर कोण आहेत?

यापूर्वी शिवसेनेत असलेले शिवराज बांगर यांनी नंतर वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. पण या पक्षात ते जास्तकाळ टिकू शकले नाही. नंतर त्यांनी मनसेत प्रवेश केला, सध्या ते उसतोड मजुर सेलेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते.

बीआरएसचा महाराष्ट्रात शिरकाव

तेलंगनाच्या मुख्यमंत्र्यांकडून त्यांच्या पक्षाच्या वाढीसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी नांदेड जिल्ह्यात दोन सभा घेतल्या. यानंतर नांदेड, परभणी जिल्ह्यातील अनेक वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी, मनसे, शेतकरी संघटना अशा पक्ष व संघटनेतील अनेक नेते, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने बीआरएसमध्ये प्रवेश करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT