Deputy Tahsildar Asha Wagh News esakal
मराठवाडा

Beed | नायब तहसीलदारावर कोयत्याने प्राणघातक हल्ला, केज तहसीलमधील घटना

सख्ख्या भावानेच केला बहिणीवर कोयत्याने हल्ला

रामदास साबळे

केज (जि.बीड) : सख्ख्या भावाने आपल्या नायब तहसीलदार असलेल्या बहिणीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवार (ता.सहा) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास केज तहसील (Kaij Tahsil) कार्यालयातील आस्थापना विभागात घडली. या घटनेने तहसील कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या महिला नायब तहसीलदाराचे नाव आशा वाघ असे आहे. शहरातील तहसील कार्यालयात मागील काही वर्षांपासून आशा वाघ या नायब तहसीलदार (Deputy Tahsildar Asha Wagh) पदावर कार्यरत आहेत. (Brutal Attack On Deputy Tahsildar Asha Wagh In Kaij Of Beed)

त्या नित्याप्रमाणे तहसील कार्यालयातील आस्थापना शाखेत सेवा बजावत असताना सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांचा सख्ख्या भावाने अचानक येऊन गोंधळ घालत अचानक धारदार कोयत्याने हल्ला केला. या घटनेने तहसील कार्यालयात गोंधळ उडाल्याने प्रसंगावधान साधून तेथील महसुल कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला एका खोलीमध्ये कोंडून ठेवले. त्यानंतर पोलीसांना पाचारण केले. (Beed Crime)

या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी हल्ल्यात वापरण्यात आलेल्या धारदार कोयत्यासह हल्लेखोरास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. हा हल्ला संपत्तीच्या वादातून घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : मुंबईकरांचे म्हाडाच्या लॉटरीतील घराचे स्वप्न लांबणीवर!

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT