संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र. 
मराठवाडा

जालन्यात बिल्डरच्या अपहरणाचा थरार 

सकाळ वृत्तसेवा

जालना -  शहरातील एमआयडीसी परिसरातून एका वृद्ध बिल्डर्सचे मंगळवारी (ता. 21) भरदिवसा कॉफीत गुंगीचे औषध देऊन अपहरण केल्याची घटना घडली. सदर बाजार पोलिसांनी अपहरणकर्त्याला अटक करून वृद्ध बिल्डर्सची सुटका केली आहे. दरम्यान, हे अपहरण जमिनीच्या वादातून करण्यात आले होते, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. 

शहरातील बांधकाम व्यावसायिक शंकरलाल बिरदुराम शर्मा (रा. सकलेचानगर, जालना) हे मंगळवारी (ता.21) सकाळी अकराच्या सुमारास कामानिमित्त एमआयडीसी परिसरात गेले होते; मात्र ते परत आले नाहीत. त्यामुळे त्यांचा मुलगा कुणाल शर्मा यांनी शंकरलाल शर्मा यांना मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचा मोबाईल बंद होता. त्यामुळे कुणाल शर्मा यांनी याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात माहिती दिली.

नंतर सदर बाजार पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवीत सकलेचानगर ते एमआयडीसी मार्गावर चौकशीसह सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावरून बांधकाम व्यावसायिक शंकरलाल शर्मा यांचे अपहरण झाल्याचे पुढे आले. त्यानंतर बुधवारी (ता. 22) पहाटे शंकरलाल शर्मा हे शेंद्रा (ता.जि. औरंगाबाद) एमआयडीसी परिसरातील हॉटेल परिसरात एका कारमधून त्यांची सुटका केली व अपहरणकर्ता झाकीर यासीन राठौर (वय 45, रा. एमआयडीसी, जालना) याला अटक केली; तसेच दीड लाख रुपयांची कार ही जप्त केली आहे. बांधकाम व्यावसायिक शंकरलाल शर्मा यांचे जमिनीच्या वादातून अपहरण करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. 

दरम्यान, ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे, पोलिस उपनिरीक्षक रमेश रूपेकर, पोलिस उपनिरीक्षक गणेश झलवार, कर्मचारी सुधाकर मगरे, अशोक जाधव, दीपक घुगे, समाधान तेलंग्रे, संदीप बोंद्रे, रमेश फुसे, सुधीर वाघमारे, साई पवार, सोपान क्षीरसागर, बाबा गायकवाड, फुलचंद गव्हाणे, योगेश पठाडे, महिला कर्मचारी सिंधू खर्जुले, बाली राठोड, प्रियांका बोरकर, बंटी ओहळ आदींनी केली आहे. 

कॉफीतून दिले गुंगीचे औषध 

बांधकाम व्यावसायिक शंकरलाल शर्मा यांना मंगळवारी (ता.21) सकाळी 11 वाजता झाकीर राठौर याने फोन करून एमआयडीसी येथील त्याच्या कार्यालयात बोलविले होते. श्री. शर्मा कार्यालयात गेल्यानंतर झाकीर राठौर याने त्याच्या कारचालकाला दोन कॉफी देण्यास सांगितले. शंकरलाल शर्मा हे कॉफी पिल्यानंतर ते तेथून प्लॉटवर गेले. तेथे गेल्यानंतर शर्मा यांना गुंगी आल्याने ते झाकीर राठौर यांच्या कारमध्ये बसल्यानंतर ते बेशुद्ध झाल्याचे बांधकाम व्यावसायिक शंकरलाल शर्मा यांनी पोलिसांना सांगितले. 

सुटकेनंतर उपचार 

बांधकाम व्यावसायिक शंकरलाल शर्मा यांची पोलिसांनी सुटका केल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आला. उपचारानंतर त्यांनी पोलिसांकडे जबाब नोंदविला. 

संशयिताला पोलिस कोठडी 

दरम्यान, संशयित आरोपी झाकीर राठौर याला बुधवारी (ता. 22) पोलिसांनी न्यायालयासमोर हजार केले. न्यायालयाने त्याला ता. 25 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT