file photo 
मराठवाडा

‘कोरोना’चा परिणाम : बस, रेल्वेची ओसरली गर्दी !

गणेश पांडे

परभणी : राज्यभरात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोना विषाणूचा प्रसार हा गर्दीच्या ठिकाणी जास्त होत असल्याचे त्यापासून बचाव करण्यासाठी अनेकांनी आपले गाव व घर सोडणेच नको, असे ठरवून टाकल्याने याचा विपरित परिणाम रेल्वे, बस व खासगी वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात झाल्याचे चित्र परभणी जिल्ह्यात दिसत आहे. एरवी भरगच्च असणाऱ्या परभणीच्या रेल्वेस्थानकासह बसस्थानकावरदेखील तुरळक प्रवाशी दिसत आहेत. खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवाशी संख्येवरदेखील परिणाम दिसून आला आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार राज्यात दिसून आला आहे. काही ठिकाणी कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळल्याने राज्य शासनाने खबरदारीच्या सर्व उपाययोजना सुरू केल्या आहेत. राज्यातील नागरी भागातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश शनिवारी (ता. १४) काढण्यात आले आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने कोरोनाच्या संसर्गापासून टाळण्यासाठी सांगण्यात आलेल्या उपाययोजनांमध्ये गर्दीचा संपर्क टाळावा हे सांगण्यात आल्याने नागरिक गर्दीपासून दूर राहताना दिसत आहेत. याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे.


निम्मे प्रवाशी दोन्ही स्थानकांवर
 एरव्ही परभणीचे बसस्थानक व रेल्वेस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहावायास मिळते. दोन्ही स्थानकांवर सकाळी सहापासून ते रात्री ११ पर्यंत प्रवाशांची वर्दळ सुरूच असते. परंतु, तीन ते चार दिवसांपासून या वर्दळीवर परिणाम दिसून आला आहे. नेहमीपेक्षा निम्मे प्रवाशी या दोन्ही स्थानकांवर दिसून आले. अनेक बस किरकोळ प्रवाशी घेऊन धावतांना दिसत होते. रविवारी (ता. १५) सकाळी नांदेडकडे जाणाऱ्या व औरंगाबादकडे जाणाऱ्या रेल्वेतही म्हणावी तशी गर्दी दिसून आली नाही.


जाणाऱ्यात घट, येणाऱ्यात वाढ
खासगी ट्रव्हल्स कंपन्यांना या विषाणूच्या संसर्गाचा फटका बसला आहे. परभणी शहरातून दररोज ७० ते ८० ट्रॅव्हल्स पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, कोल्हापूर या मोठ्या शहरांकडे धावत असतात. त्यात पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. परंतु, पुण्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याच्या बातम्या येऊन धडकल्यानंतर पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांमध्ये अचानक ४० ते ५० टक्के घट झाल्याचे दिसून आले. पुण्याहून परभणीकडे येणारे प्रवाशी वाढले असल्याची माहिती बालाजी ट्रॅव्हल्स कंपनीचे बालाजी झरकर यांनी सांगितले.


बाजारातील गर्दी रोडावली
कोरोना विषाणूचा धसका शहरातील नागरिकांनीदेखील घेतला आहे. दररोजच्या बाजारपेठेत फिरकणाऱ्या तसेच खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्याही रोडावली आहे. शहरात नुकत्याच सुरू झालेल्या सुपरशॉपीमध्येही म्हणावे तसे ग्राहक फिरकत नसल्याचे दिसत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"आम्हाला, त्याची गरज होती, आम्ही आनंदी..."! पाकड्या अबरारला करारबद्ध करण्याचा SRH कडून बचाव; विसरले, भारताचा केलेला अपमान

LPG Crisis: गॅस टंचाईवर ८० लाख लिटर केरोसीनचा ‘बॅकअप’ प्लॅन तयार, काळाबाजारावर योगींची कारवाई

Pune-Bangalore Highway Accident : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात; शिरोली पुलाजवळ, भरधाव मोटार बॅरिकेड्सला धडकली

Bike Accident: पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Xiaomi 17 Price : भारतात लाँच झाला शाओमी 17 स्मार्टफोन; पाहा किंमत अन् दमदार फीचर्स..

SCROLL FOR NEXT