photo 
मराठवाडा

व्यापाऱ्याला झोप पडली १८ लाखांना

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : हैदराबाद येथील एका व्यापाऱ्याची १८ लाख रुपयांची बॅग चोरट्यांनी लंपास केल्याची घटना हिंगोली ते वाशीम मार्गावर रविवारी (ता. आठ) घडली. खासगी बस एका ढाब्यावर थांबली असता हा प्रकार झोपेतून जागे झालेल्या व्यापाऱ्याच्या लक्षात आला.

हैदराबाद येथील जियागुडा बकरीमंडी येथील मिरची व्यापारी जी. श्रीनिवासराव नरसिंगराव हे अकोला येथील व्यापाऱ्यांना मिरचीची विक्री करतात. यानिमित्त पैसे घेण्यासाठी तेथे नेहमी जातात. शनिवारी (ता. सात) पैसे घेण्यासाठी अकोला येथे गेले होते. त्‍यांनी मिरची विक्री केलेल्या दोन व्यापाऱ्यांकडून अठरा लाख रुपयांची वसुली केली. ते पैसे एका बॅगमध्ये ठेवून एका खासगी बसने अकोला येथून नांदेडकडे निघाले होते. बसमध्ये ते बॅग उशाखाली घेऊन झोपले होते. 

हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली ते वाशीम रोडवर चिंचाळा येथील रयत ढाब्यावर रात्रीच्या वेळी बस जेवणासाठी थांबली होती. काही प्रवाशांनी खाली उतरून जेवण केले. मात्र, श्रीनिवासराव यांना झोप लागली होती. काही वेळातच श्रीनिवासराव यांना जाग आली. मात्र, त्यांच्या उशाखाली असलेली बॅग दिसली नाही. त्यांनी हा प्रकार गाडीचालक यांना सांगितला. त्यानंतर खासगी बस हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात आणण्यात आली. या प्रकरणी श्रीनिवासराव यांच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्‍थळी पोलिस निरीक्षक जगदीश भंडारवार व पथकाने भेट दिली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आर. व्ही. तायडे करीत आहेत.

भरदिवसा लाखाची घरफोडी

कनेरगाव नाका (जि. हिंगोली): आडगाव मुटकुळे (ता. हिंगोली) येथे चोरट्यांनी घर फोडून एक लाख दहा हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवारी (ता. सात) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आडगाव मुटकुळे येथील शेतकरी लक्ष्मण मुटकुळे हे नेहमीप्रमाणे त्यांच्या पत्नी व मुलांसह शेतात सकाळी दहाच्या सुमारास घराला कुलूप लावून गेले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास लक्ष्मण मुटकुळे यांच्या पत्नी शेतातून घरी आल्या. त्‍या दरवाजा उघडायला गेल्या असता त्यांना कुलूप तोडलेले दिसले. तेव्हा त्यांनी फोन करून लक्ष्मण मुटकुळे यांना बोलावून घेतले.

गावात भीतीचे वातावरण

श्री. मुटकुळे घरी आले असता त्यांना घरातील पैसे व दागिने असलेली पेटी दिसली नाही. त्यांनी शोध घेतला असता घराच्या काही अंतरावर ही पेटी फेकून दिलेली आढळली. पेटीतले रोख ८० हजार रुपये व तीस हजार रुपयांचे सात ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे आढळले. त्यांनी घटनेची खबर हिंगोली ग्रामीण पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. त्यानंतर श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रायव्हरच्या बाजूला मान खाली घालून बसलेले मनोज जरांगे; तब्येत अचानक बिघडली, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू, नेमकं काय झालं?

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

Chamoli Tunnel Tragedy: ३० तासांनंतरही ३ मजूर बेपत्ता; बोगद्यातील साचलेले पाणी ठरतेय रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये मुख्य अडथळा

Marathi News Live Updates : पुण्यातील डेक्कन परिसरातील कॅफेत पहाटे कोयता गँगचा धुमाकूळ

Khambatki Ghat Traffic : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; पारगाव-खंडाळा परिसरात वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT