cotton.jpg 
मराठवाडा

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर कापूस खरेदी  

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : मोबाईल व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून सोमवारपासून कापूस पणन महासंघाची हमी दराने कापूस खरेदी सुरु होणार असल्याची बातमी येत आहे. या अनुषंगाने सध्या राज्यात कोरोना व्हायरस आजाराने थैमान घातलेले असून कापूस खरेदी करणे, त्यावर प्रक्रिया करणे तसेच सरकी व गाठीची डिलेव्हरी करण्यासाठी लागणारे जादाचे मनुष्यबळ, मजूर संख्या यामुळे कोरोना व्हायरस या संसर्गजन्य आजारासाठी शासनाने घालून दिलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे पालन करणे कठीण असल्यामुळे अजून पर्यंत कापूस खरेदी सुरु करण्याबाबत अधिकृत धोरण जाहिर झाले नाही, याची नोंद सर्व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी घ्यावी, असे आवाहन कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष अनंत देशमुख व उपाध्यक्ष विष्णूपंत सोळंके यांनी केले आहे.

५० ते ७० पर्यंत मनुष्यबळाची गरज
या सर्व कामांसाठी एका जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी आवारामध्ये ५० ते ७० पर्यंत मनुष्यबळ कार्यरत राहते. त्यामुळे शासकीय संचारबंदीच्या घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे तसेच दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे या सारख्या महत्वाच्या बाबींवर नियंत्रण ठेवणे कठीण होणार आहे. त्यामुळे सर्व परिस्थिती पाहता शासनाद्वारे याबाबत अधिकृत नियमावली किंवा परिपत्रक प्राप्त झाल्या शिवाय कापूस पणन महासंघाद्वारे कापूस खरेदी सुरु करण्याबाबत निर्णय घेता येणार नाही.

५४ लाख क्विंटल कपाशीची खरेदी
कापूस पणन महासंघाने सोमवार ता. २३ मार्च पर्यंत ५४.०६ लाख क्विंटल कापसाची खरेदी केलेली आहे. सोमवार ता. २३ मार्च पूर्वी खरेदी केलेल्या कापसावर प्रक्रियेचे कामकाज सुरु आहे. आजमितीस जवळपास सर्व जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमधील मजूरवर्ग कोरोना आजाराच्या भितीपोटी आपल्या गावी गेलेले आहेत. आजच्या परिस्थितीमध्ये मजुरांअभावी प्रक्रियेच्या कामकाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात व्यत्यय येत आहे. त्यामुळे नव्याने कापूस खरेदी करतेवेळी अपेक्षित मनुष्यबळ प्राप्त करुन घेणे गरजेचे आहे. खरेदी केलेल्या कापसावर तातडीने प्रक्रिया न केल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची संभावना असते. त्याचप्रमाणे कापूस खरेदी करतेवेळी संपर्कात येणारे सर्व कर्मचारी, शेतकरी व मजूर वर्गाला कोरोनाची बाधा होवू नये या सर्व बाबी लक्षात घेवून कापूस खरेदी तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे.

आजाराच्या प्रतिबंधासाठी खरेदी बंद
फॅक्टरी परिसरात काम करीत असलेल्या कर्मचारी, शेतकरी व मजुरांना या आजाराची लागण झाल्यास त्यांच्यामार्फत गावा-गावात, समाजात कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. या आजाराच्या प्रतिबंधासाठी सद्य:स्थितीत कापूस खरेदी बंद केली असली तरी कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास अथवा शासनाने आदेशानुसार महासंघातर्फे कापूस खरेदी पुन्हा कार्यरत करण्यासाठी महासंघ काम करेल. याची नोंद सर्व कापूस उत्पादक शेतकरी बांधवानी घ्यावी, असेही आवाहन कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष अनंत देशमुख व उपाध्यक्ष विष्णूपंत सोळंके यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : फिटमेंट फॅक्टरबाबत नवी मागणी समोर; बेसिक सॅलरीत होणार मोठी वाढ?

Satara: कऱ्हाडच्या उड्डाणपुलाचं उद्घान लांबणीवर, प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागणार; NHAIने कंत्राटदाराला दिले नवे आदेश

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा उलटफेर! खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली; आज किती आहे 10 ग्रॅम सोन्याचा भाव?

‘सासूसोबत पत्रिका जुळली तरच लग्न!’ सासू-सुनेच्या नात्यातील गोडवा जपणारी 'कपबशी'ची अनोखी कथा

आमदार निधी कुठे वापरला? हिशोब मतदारांपुढे ठेवणारा लोकप्रतिनिधी; कोण होते प्रा. बी.टी. देशमुख?

SCROLL FOR NEXT