मराठवाडा

Latur News: अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर होतं घर... भीषण कार अपघातात प्राध्यापकाचा मृत्यू

अहमदपूर तालुक्यातील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्रा.रवी बापूसाहेब कदम व त्यांचे सहकारी प्रा.लक्ष्मण धर्मराज जोगदंड हे दोघेजण कार क्रमांक एम.एच - 24 - ए.एफ 3833 ने केज तालुक्यातील भाटुंबा येथून 25 मे रोजी संध्याकाळी अहमदपूरकडे येत होते.

प्रा. रत्नाकर नळेगावकर

अहमदपूर : कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात जखमी झालेल्या प्राध्यापकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ९० किलोमीटरचा प्रवास सुखरुप आटोपल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर घर होतं. त्यापूर्वीच कारला अपघात झाला आणि त्यात रवी बापूसाहेब कदम (48 वर्षे ) यांचे निधन झाले. याप्रकरणी कार चालकावर किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

अहमदपूर तालुक्यातील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्रा.रवी बापूसाहेब कदम व त्यांचे सहकारी प्रा.लक्ष्मण धर्मराज जोगदंड हे दोघेजण कार क्रमांक एम.एच - 24 - ए.एफ 3833 ने केज तालुक्यातील भाटुंबा येथून 25 मे रोजी संध्याकाळी अहमदपूरकडे येत होते. तालुक्यातील परचंडा पाटी येथे संध्याकाळी नऊच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला थांबलेल्या अशोक लेलँड ट्रक क्रमांक एम.एच-22- ए.ए -1942 ला पाठीमागून धडक दिल्याने या अपघातात प्रा.रवी बापूसाहेब कदम हे डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाले तर प्रा. लक्ष्मण जोगदंड यांनाही मार लागला.

दरम्यान, उपचार घेत असताना सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात प्रा.रवी कदम यांची 29 मे रोजी रात्री प्राणज्योत मालवली. या प्रकरणात ट्रक ड्रायव्हर तानाजी विठ्ठल रणदिवे (38 वर्षे) रा.विळेगाव ता.देवणी यांच्या फिर्यादीवरून कारचालक प्रा. लक्ष्मण जोगदंड यांच्याविरोधात आपल्या ताब्यातील कार हायगयी व निष्काळजीपणे चालवून ट्रकला धडक दिल्याने ट्रकचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले व स्वतःचे व बाजूला बसलेल्या व्यक्तीचे गंभीर दुखापतीस कारणीभूत झाल्यावरून किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून तपास सहाय्यक फौजदार एम.एन.कल्याणे यांच्याकडे देण्यात आला आहे.

अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर होतं घर...

केज तालुक्यातील भाटुंबा या गावापासून जवळपास 90 मिनिटांचा 90 किलोमीटर प्रवास सुखरूप झाला होता. अपघाताचे ठिकाण परचंडापाटी पासून अहमदपूर हे दहा किलोमीटर अंतरावर असून अवघ्या दहा मिनिटात त्यांचा प्रवास संपणार होता. परंतु त्यांच्या कारला भीषण अपघात झाला.

सैनिकी स्कूलला शिक्षण झालेले प्रा.रवी कदम हे महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात सन 2004 पासून इंग्रजी विषयाच्या अध्यापनाचे काम करीत होते. मनमिळावू स्वभाव असलेल्या प्रा.रवी कदम यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार असून त्यांच्यावर 30 मे रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026 चं तिकीट १०० रुपयांपासून सुरू, आजपासून बूक करता येईल तिकीटं; पण, कुठे अन् कसं? घ्या जाणून

Bajarang Sonwane Video: बीडच्या खासदाराने लोकसभा गाजवली! ओम बिर्लांनाही हसू आवरेना; म्हणाले, तुम्ही उजवीकडे बघून हसता...

Latest Marathi News Live Update : सक्षम ताटे प्रकरणात सेकंड FIR करण्यासाठी कुटुंब आग्रही

Kolhapur Anganwadi Workers : सरकारच्या अपूर्ण आश्वासनांवर संताप; मानधन वाढीसाठी अंगणवाडी सेविका रस्त्यावर, तीव्र आंदोलनाची गर्जना

Ahilyanagar News : धार्मिक संवेदनशीलता अबाधित ठेवण्याची सरकारला सूचना; खा. नीलेश लंके यांची मंदिर परिसराला भेट!

SCROLL FOR NEXT