Osmanabad Accident News esakal
मराठवाडा

Osmanabad Accident| कार पलटी; एकाचा जागेवरच मृत्यू, पाच जण जखमी

एकाचा जागेवरच मृत्यू

नीलकंठ कांबळे

लोहारा (जि.उस्मानाबाद ) : लोहारा-पाटोदा रस्त्यावरील करजखेडा (ता.उस्मानाबाद) गावाजवळ कार पलटी झाल्याने एकाचा जागेवरच मृत्यू झाला. तर कारमधील पाच जण जखमी झाले आहेत. जखमीमध्ये चार लहान मुलांचा समावेश आहे. त्यांच्यावर लोहारा (Lohara) येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना सोमवारी (ता.१६) सकाळी आठच्या सुमारास घडली. ज्ञानेश दीक्षित (वय ४५ रा. डिसकळ ता. कळंब) असे मृताचे नाव आहे. दीक्षित यांची लोहारा सासरवाडी आहे. ते आपल्या कुटुंबासह येथे आले होते. (Car Collided, One Man Died And Five Injured In Lohara Of Osmanabad)

दोन दिवसाच्या मुक्कामानंतर ते आपल्या कुटंबासह सोमवारी सकाळी कारने (एमएच २५ एएल ४२५४) डिकसळकडे निघाले होते. दरम्यान, लोहारा-पाटोदा रस्त्यावरील करजखेडा गावाजवळ समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्याचा प्रयत्नात कार पलटी झाली. त्यात ज्ञानेश दीक्षित यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी शीतल दीक्षित, प्राजक्ता दीक्षित, अवधूत दीक्षित, स्वानंद पंडित, कृष्णा पोतदार हे पाचजण जखमी झाले. लोहारा-पाटोदा रस्त्याचे सध्या काम सुरू आहे. रस्त्याच्या एका बाजूचे डांबरीकरण झाले आहे. (Osmanabad)

दुसऱ्या बाजूचे काम झाले नाही. त्यामुळे डांबरी रस्त्यावरून वाहने चालवली जातात. मृत दीक्षित हे आपल्या कारने जात होते. यावेळी समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्याच्या प्रयत्नात त्यांची कार तीन वेळा पलटी झाली. कार पलटी होताना दीक्षित गाडीच्या बाहेर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागून मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी, मुले व मेहुण्याचे दोन मुले गाडीत अडकली होती. यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांना बाहेर काढून लोहारा येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: 'होर्मुझ'मधील निर्बंध अखेर शिथिल होणार; इराणच्या अण्वस्त्र प्रकल्पांबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

Snakebite Antivenom: सर्पदंशावरील जीवनरक्षक लस निर्मितीसाठी डॉ. श्याम ढवण यांना उद्योगरत्न पुरस्कार

Junnar Crime : कुसुरमध्ये वडज धरण परिसरात शेती पंपाच्या केबल चोरीचा प्रयत्न फसला; तीन चोरटे नागरिकांच्या मदतीने पोलिसांच्या जाळ्यात

Porsche Car Accident : जामीनाच्या अटींचा भंग झाला असून साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता

खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे थेट मैदानात; विदर्भातून फुंकणार रणशिंग; आदित्य ठाकरे, संजय राऊतही सोबत...

SCROLL FOR NEXT