Cardiac Patient Voting For Osmanabad District Cooperative Bank Election esakal
मराठवाडा

हृदयविकाराचा झटका काल आला, आज चक्क मतदार रुग्णवाहिकेतून पोचला मतदानासाठी

हृदयविकाराचा रुग्ण चक्क कार्डियाक रुग्णवाहिकेतून मतदान केंद्रावर येऊन मतदान केले.

दिलीप गंभिरे

कळंब (जि.उस्मानाबाद) : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये रविवारी (ता.२०) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. ह्रदयविकाराचा झटका (Heart Attack) आलेल्या सोसायटी मतदारसंघातील तालुक्यातील सौंदणा (आंबा) येथील रुग्णाला कार्डियाक रुग्णवाहिकेतून मतदानासाठी आणण्यात आले. या रुग्णावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मधुकर पालकर सोसायटी मतदारसंघातील मतदार असून त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांना शनिवार (ता.१९) हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेत असलेल्या रुग्णांनाच मतदानासाठी मतदान केंद्रावर हजर केल्याने जीवापेक्षा मतदान भारी पडल्याचे बोलले जात आहे. यामुळे उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणुकीची (Osmanabad District Cooperative Bank Election) चुरस देखील वाढली आहे. (Cardiac Patient Come By Ambulance For Osmanabad District Bank Election In Kalamb)

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी येथील प्रशासकीय इमारतीमधील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया घेण्यात आली. अत्यंत चुरशीने मतदान होत असून शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, भाजपचे युवा नेते मल्हार पाटील, ग्रामीण भागातील भाजपचे कार्यकर्ते तळ ठोकून होते. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व भाजपने सहलीवर नेलेले मतदार सकाळी मतदान केंद्रावर मतदानासाठी हजर केले. महाविकास आघाडीचे व भाजपचे कार्यकर्ते अद्याप किती मतदान झाले. किती होईल यावर बारीक नजर ठेवून होते. येथील केंद्रावर सोसायटी मतदारसंघाचे ७०, इतर सहकारी संस्था ३५ व बँक पतसंस्थेचे २५ असे १३० मतदार आहेत.

खासदार राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील व भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असून अत्यंत चुरशीने मतदान प्रक्रिया येथील केंद्रावर पार पडली. तालुक्यातील सौंदणा आंबा येथील सोसायटी मतदारसंघातील मधुकर पालकर यांना हृदयविकाराचा झटका आल्याने औषधोपचारासाठी रुग्णालयात उपचार सुरू होते. मतदान करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी धावाधाव करीत हृदयविकाराच्या रुग्णाला चक्क कार्डियाक रुग्णवाहिकेतून मतदान केंद्रावर आणून मतदान घेण्यात आले. त्यामुळे जीवापेक्षा मतदान भारी म्हणण्याची वेळ आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT