आचार्य तुषार भोसले
आचार्य तुषार भोसले  esakal
मराठवाडा

भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांच्यावर गुन्हा दाखल

जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी मंदिरात बेकायदा प्रवेश केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांच्यासह इतर लोकांवर गुरूवारी (ता.सात) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले हे गुरूवारी दुपार दोन वाजण्याच्या सुमारास तुळजा भवानी मंदिरात आले होते. भोसले यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. तसेच मंदिरात माध्यमांशी संवाद ही साधला होता. जिल्हाधिकारी तथा कौस्तुभ दिवेगांवकर यांनी यासंदर्भात चौकशीचे कारवाईचे आदेश दिले होते. प्राधिकृत अधिकारी योगेश खरमटे यांनी या संदर्भात कारवाई होईल, असेही गुरूवारी सांगितले होते. या संदर्भात तुळजाभवानी मंदिर समितीचे सहायक व्यवस्थापक प्रवीण सिताराम अमृतराव यांनी या संदर्भात तुळजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. श्री. भोसले यांनी मंदिरात इतरांसह प्रवेश करून तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले होते. या संदर्भात गुन्ह्याची नोंद गुरूवारी (ता.सात) मध्यरात्री झालेली आहे.

ते इतर लोक कोण ?

तुषार भोसले यांच्यासोबत असणारे कोण लोक आहेत. याचा पोलिसांना तपास करावा लागणार आहे. राजकीय वजनदार व्यक्ती असल्यामुळे या प्रकरणाच्या तपासात काही कानाडोळा होतो का याचीही चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT