A case has been registered against two persons in connection with the death of a young man in Karnataka 
मराठवाडा

दुचाकीने निघाले तीन मित्र; एकाला गंभीर दुखापत तर दोघांना खरचटलेही नाही; फक्त एका चुकीने झाला गुन्हा दाखल

अविनाश काळे

उमरगा (जि. उस्मानाबाद) : उमरगा तालुक्याच्या सिमेलगत असलेल्या कर्नाटकातील खजुरी गावाच्या तरुणाच्या खून प्रकरणी खजुरीतीलच दोन मित्रांविरुद्ध मंगळवारी (ता. नऊ) रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

लातूर-कलबुर्गी मार्गावर इंद्रधनू वृद्धाश्रमाच्या प्रवेशद्वाराच्या जवळपास शनिवारी (ता. सहा) रात्री दुचाकीच्या अपघातात जखमी असलेल्या तरुणाला शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर रविवारी (ता. सात) सकाळी त्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू संशयास्पद असल्याने खूनाचा गुन्हा दाखल झाला असून, गुंतागुंतीच्या या प्रकरणाचा तपास करण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंद तालुक्यातील खजुरी येथील संतोष इराण्णा सावळसुरे (वय ३२) हा शनिवारी दुचाकीवरून गावातील मित्र भीमाशंकर करबसप्पा तळवार, संजयकुमार शिवपूत्र हुगार यांना घेऊन उमरगा-चौरस्त्याजवळील बिरूदेव मंदिर परिसरातील जनावरांच्या बाजारात आले होते.

रात्री साडेआठच्या सुमारास तिघेही परत खजुरीकडे जात असताना वृद्धाश्रमाजवळ रस्त्यावर संतोष सावळसुरे जखमी अवस्थेत पडल्याने कांही जणांनी रुग्णवाहिका बोलावून उमरग्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रविवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
 
तपासाचे पोलिसासमोर आव्हान

तिघे मित्र एकाच दुचाकीवरून जात असताना अपघातात संतोषच्या हाता, पायावर जखमा होत्या. मात्र, भीमाशंकर व संजयकुमार या दोघांना कसलीही दुखापत नव्हती. दुचाकीचेही नुकसान झाले नव्हते. मग संतोष नेमका जखमी कसा झाला, हा प्रश्न आहे. शिवाय संतोषला उपचारासाठी नेताना दोघे मित्र सोबत होते. मात्र, रात्री बारा वाजता दोघेही रुग्णालयातून फरार झाले. त्यामुळे या प्रकरणात घातपाताचा संशय बळावला. याप्रकरणी संतोषची आई विजयाबाई सावळसुरे यांच्या फिर्यादीनुसार मंगळवारी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे तपास करीत आहे.

पोलिस अधिक्षकांनी घेतला आढावा

उमरगा-चौरस्ता ते कर्नाटकातील खजुरी सीमेपर्यंत यापूर्वी घातपाताच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. ३२ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणाची माहिती घेण्यासाठी उस्मानाबादचे पोलिस अधिक्षक राजतिलक रोशन यांनी बुधवारी (ता. १०) घटनास्थळी भेट देऊन उमरगा पोलिस ठाण्यात माहिती घेतली. पोलिस निरीक्षक मुकुंद अघाव आरोपींच्या शोधासाठी कर्नाटकाच्या पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली, स्वतंत्र पथकामार्फत तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Kolhapur visit cancelled : अमित शहांचा कोल्हापूर दौरा रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने हुबळीतून दिल्लीकडे रवाना

Asian Games 2026: श्रेयस अय्यरच्या संघाला जपानला जाण्यापूर्वी धक्का; BCCI, IOA ची पळापळ, नेमकं काय घडलं?

धावती लोकल पकडायला गेला, अचानक तोल जाऊन ट्रेनखाली येणार इतक्यात...; RPF जवानांनी तरुणाला दिले जीवनदान, Video Viral

Latest Marathi News Update : गोकुळ निवडणुकीमध्ये भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार

Western Ghats Biodiversity : सह्याद्रीच्या कुशीत दडलाय अमूल्य खजिना! आजरा परिसरात सापडल्या शेकडो दुर्मीळ औषधी वनस्पती; टाटा संस्थेकडून सर्वेक्षण

SCROLL FOR NEXT