जालना - सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून साऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र कोरोनाच्या धास्तीतही लाचखोरांची मस्ती कायमच असल्याचे दिसत आहे. जाफराबाद तालुक्यातील बोरगाव सजाचा तलाठी आणि संगणक चालकाला शुक्रवारी (ता.२०) सहा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे.
तक्रारदार यांची वडिलोपार्जित जमिनीची वाटणी करण्यासाठी बोरगाव सजाचे तलाठी विजय रामभाऊ गरड याने १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
हेही वाचा : परदेशातून आलेल्या डॉक्टरला नोटीस
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (ता.१९) सापळा लवून तक्रारीची खात्री केली. त्यानंतर शुक्रवारी (ता.२०) तक्रारदार यांच्याकडून तडजोडीअंती तलाठी विजय गरड याने संगणक चालक ज्ञानेश्वर सुभाष पंडित याच्या हस्ते सहा हजार रुपयांची लाच स्वीकारली.
हेही वाचा : गुंजच्या गोदापात्रात उभारणार मिनी बंधारा
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संग्राम ताटे, एस.एस. शेख, कर्मचारी मनोहर खंडाघळे, अनिल सानप, शिवाजी जमधडे, कृष्णा देठे, गजानन कांबळे, गणेश बुजाडे, ज्ञानेश्वर म्हस्के, गणेश चेके, जावेद शेख, प्रविण खंदारे, आरेफ शेख यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.