mahila 
मराठवाडा

गणगौरीच्या उत्सवानिमित्त महिलांचा गीतांवर ठेका... कुठे ते वाचा  

राजेश दारव्हेकर

हिंगोली ः शहरात विविध ठिकाणी गणगौरीच्या उत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांसह विविध गीतांची सकाळ, सायंकाळी धूम सुरू असून तो सोळा दिवस चालणार आहे. शहरातील अग्रवाल समाजातर्फे बालाजी मंदिरात कार्यक्रम सुरू झाला आहे.

शहरातील बालाजी अग्रवाल मंदिर, शिवाजीनगर, रिसाला बाजार, मारवाडीगल्‍ली, महावीरनगर आदी ठिकाणी सकाळ व सायंकाळी महिला एका ठिकाणी येऊन गणगौरीच्या गीतांची धूम सुरू आहे. राजस्‍थानी समाजातील सौभाग्यवती व मुलींचा लाडका सण म्‍हणून ओळखल्या जाणाऱ्या गणगौरी सणानिमित्त शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.

सोळा दिवस पूजा
होळीच्या दुसऱ्या दिवसापासून मारवाडी समाजात कुमारिका व नववधू गणगौरीची सोळा दिवस पूजा करतात. यात होळीच्या राखेने आठ पिंड व शेणाचे आठ पिंड तयार केले जातात. तसेच एका टोपलीत दुर्वा ठेवून त्‍यावर पिंड ठेवले जातात. तांब्यात पाणी, दुर्वा व फूल घेऊन दुर्वाची गीते सादर करून शेणाने सारवलेल्या ठिकाणी ही टोपली ठेवून एका कागदावर काजळ, मेहंदी, कुंकवाच्या सोळा टिकल्या देऊन त्‍याची पूजा केली जाते. सप्तमीच्या दिवशी कुंभाराकडून दोन मातीची टोपली आणून त्‍यात गव्हाचे धान्य पेरले जाते. त्‍याला जवारे म्‍हणून ओळखले जाते.

नववधू येते माहेरी
या सणात नववधू माहेरी येते. तीन नवीन कपडे, दागिने, मेहंदी, सौभाग्याच्या वस्‍तूंची भेट दिली जाते. तसेच गोडधोड जेवण दिले जाते. अशा प्रकारे हा सण आनंदाने साजरा करण्याची परंपरा आहे. दरम्‍यान, शहरातील बालाजी मंदिरात अग्रवाल महिला मंडळ, महाराष्‍ट्र राज्य अग्रवाल महिला मंडळ व बहुमंडळाच्या संयुक्‍त विद्यमाने कार्यक्रम घेतला जात आहे.

तिन्ही मंडळांच्या अध्यक्षा सहभागी
या वेळी या तिन्ही मंडळांच्या अध्यक्षा यात सहभागी झाल्या होत्या. यात सरोज वाकोडीवाले, नेहा कयाल, संगीता भारुका तसेच मंडळाच्या सचिव सुनीता अग्रवाल, संगीता कयाल, सुरेखा बेनावत आदींचा समावेश आहे. येथे धार्मिक कार्यक्रमाबरोबरच विविध गीते सादर होत आहेत.

या गीतांचा समावेश
या गीतांमध्ये ‘गणगौर आयी चेंतमे, केशर कुंकू हाथमे, इसरजी होंगे साथमें गणेशची बैठे गोदमें, सखीया आयी पासमें, अखंड सुहाग की आसमें, मॉं गौरा आपकी हर मनोकामना पुरी करे’ तसेच ‘इसरजी बगा में, झुला घाल्या म्‍होर गौरल ने झुलन दिज्यो, इसर भगवान यासह रजिक म्हारा, ताऊली म्‍हारी गणगौर ओ रसीया, घडी दोय, घडी खेलबा ना जाया दो’ आदी गीते सादर करून गणगौरीचा सण साजरा केल्या जात आहे.

शेवटच्या दिवशी गणगौरीची शोभायात्रा
या सणाच्या शेवटच्या दिवशी गणगौरीची शोभायात्रा काढली जाते. त्‍यानंतर नववधू या यात्रेत सहभागी होतात. त्‍या वेळी इसर गौर घेऊन आल्यावर त्‍याची पूजा - अर्चा करण्याची परंपरा असून ‘गौर गौर गोमंती, इसर पूजा पार्वती’ असे सोळा वेळा पूजा केली जाते. अशा प्रकारे गणगौरीचा सण उत्‍साहात साजरा केला जात आहे.

पाच दिवस शोभायात्रा 
या सणामध्ये नववधू माहेरी जाते. तेथे होणाऱ्या कार्यक्रमातही सहभागी होते. हा सण संपल्यानंतर नववधूला जावयाला बोलावून जोडीने सासरी पाठविण्याची परंपरा आहे. तसेच येथे सादर होत असलेल्या विविध गीतांमध्ये पाणी, धूपआरती, जेवणाची व शोभायात्रेची अशी वेगवेगळी गीते सादर केली जातात. पाच दिवस शोभायात्रा काढून इसर गौरीची म्‍हणजे शंकर व पार्वतीचे दोन मुखवटे तयार करून त्‍याची पूजा केली जाते. -सरोज वाकोडीवाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खलिस्तानी पन्नूची दिलजीत दोसांजला धमकी; बिग बींच 'या' वादाशी काय आहे कनेक्शन?

सात महिन्यांनी आला, ऑस्ट्रेलिया दौरा गाजवला अन् रोहित शर्मा जगात भारी ठरला... ICC ची मोठी घोषणा, शुभमन गिलला केलं रिप्लेस

IIT Admission Without JEE: आनंदाची बातमी! आता जेईईशिवाय प्रवेश मिळणार 'या' IIT मध्ये, जाणून घ्या कसे

CM Devendra Fadnavis: आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींसारखी पप्पूगिरी करू नये; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी

Whatsapp बनले कलरफूल! नव्या फीचरने जिंकली लाखो मने..तुम्हीही वापरा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT