जालना : सखी केंद्र. 
मराठवाडा

नवरा मारतोय, सखीला सांगा

महेश गायकवाड

जालना -  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या महिनाभरापासून संचारबंदी करण्यात आली आहे. या काळात कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे गेलेल्या महिलांना सखी केंद्राचा आधार मिळत आहे. ज्या महिला सखी केंद्रापर्यंत पोचू शकत नाहीत, अशा महिलेचे व तिच्या कुटुंबीयांचे दूरध्वनी तसेच व्हिडिओ कॉलद्वारे समुपदेशक समुपदेशन करीत आहेत, हे विशेष. 

कौटुंबिक हिंसाचाराने त्रस्‍त असलेल्या, अत्याचाराने पीडित; तसेच बालविवाहाला बळी पडलेल्या महिलांना एकाच छताखाली आवश्‍यक उपचार व मदत मिळावी यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात सखी केंद्र ‘वन स्टॉप सेंटर’ कार्यरत आहे.

कोरोना विषाणूमुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात व्यसनाधीन पुरुषांना मानसिक व शारीरिक त्रास होत आहे. अशा व्यक्तींकडून पत्नीला मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांतील दोन महिलांनी सखी केंद्राचा आसरा घेतला आहे; तसेच ज्या महिला संकटाच्या काळात या केंद्रापर्यंत पोचू शकत नाहीत, त्यांना आवश्‍यक ती मदतही सखी केंद्राच्या व्यवस्‍थापक विद्या लंके यांच्यामार्फत केली जात आहे.

कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत महिलांना न्यायालयात अर्ज करून संरक्षण व नुकसानभरपाई आदेश मिळवून देणे, अत्याचार झालेल्या महिलांना तत्काळ उपचार देणे, परिस्थितीनुरूप अत्याचाराला बळी पडलेल्या पीडितांना आर्थिक मदत व पोलिस ठाण्यासंदर्भात लागणारी कायदेशीर मदत व मानसिक समुपदेशनही सखी केंद्रातर्फे केले जात असल्याचे केंद्राच्या व्यवस्‍थापक विद्या लंके यांनी सांगितले आहे. 

मदतीसाठी करा कॉल 

लॉकडाउनच्या काळात कौटुंबिक हिंसाचार होत असल्यास जिल्ह्यातील महिलांसाठी सखी केंद्राची चोवीस तास हेल्पलाइन सेवा सुरू आहे. संकटग्रस्‍त महिला ९४२२२६१५१६ या हेल्पलाइनवर किंवा ९४०३७५०३१२ या क्रमांकावर संपर्क करून आवश्‍यक ती मदत सखी केंद्राकडून घेऊन शकतात. 

लॉकडाउनच्या काळात कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे गेलेल्या दोन महिलांना सखी केंद्रात दाखल करण्यात आले आहे. त्यांना आवश्‍यक ती कायदेशीर व उपचाराची व्यवस्‍था करण्यात आली आहे. ज्या महिला सखी केंद्रापर्यंत पोचू शकत नाहीत त्यांचे दूरध्वनीवरून; तसेच व्हिडिओ कॉलद्वारे तज्ज्ञ समुपदेशन करीत आहे. लॉकडाउनच्या काळात कौटुंबिक हिंसाचार; तसेच अत्याचार होत असल्यास महिलांनी सखी केंद्राच्या हेल्पलाइनवर संपर्क करावा. 
- विद्या लंके, 
व्यवस्‍थापक, सखी केंद्र 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT