file photo 
मराठवाडा

परभणीच्या वातावरणात होत आहेत बदल : कोणते ते वाचा

कैलास चव्हाण

परभणी : लॉकडाउनमुळे कारखाने बंद असल्याने तसेच वाहतूक कमी झाल्याने परभणी शहरातील हवेतील गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) निम्याने घसरल्याने हवा शुद्ध झाली आहे. प्रदूषणाच्या मात्रेत मोठी घट झाल्याने हवेत स्वच्छ ऑक्सिजन आहे, अशी माहिती येथील ज्ञानोपासक महाविद्यालयातील पर्यावरण शास्त्र विभागातील प्रा. डॉ. शेख बाबर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

याविषयी बोलताना डॉ. बाबर म्हणाले, कोरोनामुळे संपूर्ण जगभरात लॉकडाउन सुरू आहे. लॉकडाउनमुळे मानवी जीवनावर आणि अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला असला तरी वातावरणावर अर्थात पर्यावरणावर चांगला परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. विविध संस्थेच्या अहवालांतही जगातील प्रदूषण निम्याने कमी झाल्याचे समोर येत आहे. गंगा नदीसारख्या अनेक मोठ्या नद्यांचेदेखील प्रदूषण कमी झाले आहे. जगभरातील कारखाने, उद्योग, वाहतूक बंद असल्याने हवेसह पाण्यातील शुध्दता वाढली आहे. वाहनांची वर्दळ कमी झाल्याने कार्बन उत्सर्जनाचे प्रमाणदेखील दहा टक्यांनी कमी झाले आहे. यामुळे ओझोनवर होणारे परिणामदेखील कमी झाल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या भागातील नदी, समुद्रकाठचे प्रदूषण कमी झाल्याच्या बातम्या येत आहेत.

मार्चमध्ये प्रदूषणाच्या मात्रेत घट
हवेमध्ये धुरके (स्मोक) आणि धुके (फॉग) यांचे फुफ्फुसजन्य आजारांना आमंत्रण देणारे घटक असतात. या हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) जर शून्य ते ५० असेल तर हवा आरोग्यास उत्तम, ५० ते १०० ठीक परंतु १०० च्या पुढे असेल कर ती हवा आरोग्यास घातक व अपायकारक असते. तसेच पी. एम २.०५ (पार्टिक्लुलेट मॅटर) चे प्रमाणे ६० मायक्रोग्रम पेक्षा जास्त आणि पीएम-१० चे प्रमाणे १०० पेक्षा जास्त नसावे. परभणी शहरातील हवेतील ‘एक्यूआय’चे प्रमाण दहा नोव्हेंबर २०१९ ते ११ फेब्रुवारी २०२० पर्यंत १३९ ते १०१ च्या दरम्यान, होते. परंतु, मार्च आणि एप्रिल महिन्यात हे प्रमाण १०० च्या खाली म्हणजे ३४ ते ८७ राहिले आहे. ता. सहा मे रोजी हवेतील एक्यूआयमधील पीएम- २.०५ चे प्रमाणे ३० आणि पीएम- दहाचे प्रमाण ३४, एनओ. दोन- प्रमाणे दोन आणि ओ- तीन चे ४२ पर्यंत नोंदविले गेले. याचा अर्थ मार्च महिन्यात प्रदूषणाच्या मात्रेत घट झाल्याचे दिसते.

हेही वाचा : आता ‘या’ साठी लागल्या नांदेडमध्ये रांगा...
 

नदी, ओढ्याचे पाणी स्वच्छ
लॉकडाउनमुळे कारखाने, उद्योग धंदे बंद असल्यामुळे नालीद्वारे वाहून जाणारे प्रदूषण कमी झाल्यामुळे नदी, ओढे आणि जलस्त्रोतातील प्रदूर्षण कमी झाल्याचे डॉ. बाबर यांनी सांगितले. कोरोनाच्या सर्व घटकांवर विपरीत परिणाम होत असताना पर्यावरणावर मात्र, चांगले परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी हा आपला मूलभूत अधिकार असून तो प्रदूषणाने हिरावून घेतला जात आहे. यावर विचार करायलाच हवा असेही डॉ. बाबर यांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT